May 14, 2026 3:00 pm

आधी लिंबू मिरच्या आणि आता अनैतिक संबंध

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

तालुक्यात आर्थिक दृष्ट्या सक्षम समजल्या जाणाऱ्या नेरळ ग्रामपंचायत मध्ये स्वतःच्या मालकीचे तलाव आहे.मनोरंजनाचे ठिकाण म्हणून समजल्या जाणाऱ्या या तलावाच्या एका निर्मनुष्य ठिकाणी कोपऱ्यात झाडे झुडपे एकत्र करीत झोपडी बनवून त्यात टाकलेली गादी पाहता ही खोली बनवली गेली आहे असे बोलले जात आहे.दरम्यान अनैतिक धंदे करण्यासाठी ही खोली बनवली असल्याचे उघड झाले असून यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे.

नेरळ ग्रामपंचायत मालकीचे राजमाता जिजामाता तलाव आहे.हा तलाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या अगदी बाजूलाच असून या ठिकाणी पहाटे पाचपासून वर्दळ सुरू होते. नेरळ गावातील राजमाता जिजामाता तलावमधील परिसर अनेक बाबींसाठी गाजू लागला आहे.निवडणूक काळात या ठिकाणी लिंबू नारळ लाल कापड टाचण्या यांचा वापर करून जादूटोणा करण्याचा प्रकार समोर आला होता. त्याआधी या ठिकाणी दुपारच्या वेळी महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच यांचे अश्लील कृत्ये चालायची.याबाबत समाज माध्यमांवर चर्चा सुरू झाल्यावर नेरळ ग्रामपंचायत कडून तलाव परिसरात सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत कुलूप लावण्यात येत होते.परंतु ग्रामपंचायत प्रशासन सुस्तावलेले असल्याने या ठिकाणी अनैतिक चाळे पुन्हा सुरू झाले असून दुपारच्या वेळी मोठी गर्दी त्या भागात दिसून येते. मात्र तरीदेखील आव जाव घर तुम्हारा याप्रमाणे नेरळ ग्रामपंचायतकडून तलावाचे गेट बंद करण्याची तसदी घेतली जात नाही.

आता त्यात आणखी भर पडली असून तेथील एका निर्मनुष्य जागी चक्क झोपडी बनवली आहे.त्या ठिकाणी झाडांच्या फांद्या कापून त्या जमिनीत खड्डे खोदून उभ्या करण्यात आल्या असून त्या सर्व फांद्यांना जुन्या साड्या गुंडाळल्या आहेत. जेणेकरून झाडांचे उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी साड्या लावल्याचा देखावा नजरेस पडत आहे.पुढे त्या झोपडीमध्ये मध्यभागी एक गादी ठेवण्यात आली असून महिलांचे कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसून येत आहेत.हा सर्व प्रकार आज सकाळी समोर आला असून पहाटे पाच पासून सतत वर्दळ असलेल्या ठिकाणी अशा झोपड्या कधी आणि कोणी कशासाठी बनवले आहेत. याची आज नेरळ मधील समाज माध्यमांवर जोरदार चर्चा सुरू आहे.दुसरीकडे त्या झोपडीला आजुबाजूला महिलांचे कपडे पडलेले असल्याने या झोपडीचा वापर अनैतिक धंदे करण्यासाठी केला जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.नेरळ ग्रामपंचायत कडून त्या ठिकाणी बसण्यासाठी बाकडे बनवले आहेत,विजेचे पथदिवे तेथे आहेत आणि ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी तेथे असताना अशा झोपड्या निर्माण होतात?याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!