May 14, 2026 3:01 pm

किशोरी पेडणेकर महापौर पदाच्या खुर्चीवर ?

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पालिका मुख्यालयात भाजपची आणखी एक नामुष्की झाली असती पण स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानंतर सोमवारी भाजपची लाज जाताजाता वाचली. मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या महापौर पदाच्या खुर्चीवर बसायला निघाल्या होत्या.

माजी महापौर आणि आताच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या महापौरांच्या आसनापर्यंत गेल्या आणि आसनावर बसणार इतक्यात भाजपचे नगरसेवक सभागृहात दाखल झाले आणि भाजपची लाज जाता जाता वाचली.

मुंबई महापालिकेच्या सभागृहात भाजपच्या नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे गेल्या आठवड्यात भाजपला नामुष्की पत्करावी लागली होती. संख्याबळाअभावी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले होते. हे प्रकरण ताजे असतानाच सोमवारी शिवसेना (ठाकरे) पक्षाने भाजपवर आणखी एक कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. गेली पंचवीस वर्षे सत्तेचा अनुभव असलेल्या शिवसेना (ठाकरे) पक्ष सभाशास्त्राद्वारे भाजपवर कुरघोडी करण्याची संधी साधत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. सोमवारी पालिका सभागृहाची दुपारी दोन वाजताची वेळ होती. सभागृहात भाजपचे नगरसेवक वगळता बाकी सर्व पक्षांचे नगरसेवक हजर होते. बराचवेळ झाला तरी सभागृह सुरू झाले नाही त्यामुळे विरोधी पक्षाने डाव टाकला.

विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी यावेळी सभागृहाची गणसंख्या (कोरम) पूर्ण झाल्यामुळे सभागृह सुरू करण्याची मागणी केली. पिठासीन अधिकारी म्हणून माजी महापौरांना खुर्चीत बसवण्याची मागणी पेडणेकर यांनी केली. त्याला ज्येष्ठ नगरसेवक यशोधर फणसे यांनी अनुमोदन दिले. त्यांचा हा प्रस्ताव त्यांच्यापुरता मर्यादित होता. चिटणीसांनी तो स्वीकारला नव्हता. अखेर स्वत: किशोरी पेडणेकर जागेवरून उठल्या आणि महापौरांच्या आसनाजवळ गेल्या. त्या आसनावर बसवणार इतक्यात तिथे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे हजर झाले आणि त्यांनी वेळीच हस्तक्षेप केला. या प्रकारानंतर किशोरी पेडणेकर यांना महापौर पदाचा मोह आवरत नसल्याचीही चर्चा रंगू लागली.

दरम्यान, सोमवारी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणूकींच्यी विजयाचा जल्लोष करण्यासाठी भाजपचे सर्व नगरसेवक पक्ष कार्यालयात जमले होते. तिथून सगळेजण एकत्र सभागृहात येणार होते असे ठरले होते. मात्र सभागृहात इतर सर्व पक्षांचे नगरसेवक हजर होते. त्याचवेळी शिवसेना (ठाकरे) पक्षाने संधी साधली.

ठाकरे यांची जेव्हा सत्ता होती तेव्हा सभागृह कधीच वेळेवर सुरू होत नव्हते. दोन वाजताची वेळ देऊन सभागृह चार वाजता सुरू होत असे. मात्र अशा खालच्या दर्जाच्या कृती आम्ही कधी केल्या नाही. किशोरी पेडणेकर या स्वत: महापौर होत्या. त्यांनी या पदाचा मान राखायला हवा होता अशी प्रतिक्रिया सभागृह नेते गणेश खणकर यांनी दिली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!