May 14, 2026 11:56 pm

विराटने गिलवर काढला सगळा राग, कॅच पकडताच समोर जाऊन गुरगुरला

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

आयपीएल 2026 मध्ये गुजरातविरुद्धच्या सामन्यात आरसीबीला पराभवाचा धक्का बसला आहे. आरसीबीने दिलेलं 156 रनचं आव्हान गुजरातने 15.5 ओव्हरमध्येच पार केलं. गुजरातचा कर्णधार शुभमन गिल याने 18 बॉलमध्ये सर्वाधिक 43 रन केले, तर जॉस बटलरने 19 बॉलमध्ये 39 रनची खेळी केली.

राहुल तेवातिया 27 रनवर नाबाद राहिला. आरसीबीकडून भुवनेश्वर कुमारला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या, याशिवाय रोमारियो शेफर्डने 2 आणि सुयश शर्माने 1 विकेट घेतली.

गुजरात आणि आरसीबीच्या या सामन्यामध्ये मैदानामध्ये मोठा ड्रामा पाहायला मिळाला. सुरूवातीला आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याच्या जेसन होल्डरने घेतलेल्या कॅचवरून मोठा वाद झाला. जेसन होल्डरने हा कॅच नीट पकडला नव्हता, असा दावा विराट कोहलीने केला. तसंच विराटने यावरून फोर्थ अंपायरसोबतही वाद घातला.

होल्डरच्या कॅचवरून वाद झाल्यानंतर विराटने शुभमन गिलचा कॅच पकडला आणि आक्रमक सेलिब्रेशन केलं. गिलचा कॅच पकडल्यानंतर विराट कोहली बराच रागामध्ये दिसत होता. भुवनेश्वर कुमारने बॅक ऑफ लेंथ टाकलेल्या बॉलवर गिलने कव्हरच्या दिशेने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण विराटने त्याचा कॅच पकडला. आरसीबीसाठी गिलचा हा कॅच किती महत्त्वाचा होता, हे त्याच्या सेलिब्रेशनवरून दिसून आलं.

हा कॅच पकडण्याआधी कोहलीने गिलचा रन आऊट सोडला होता, त्यामुळे जेव्हा दुसरी संधी आली तेव्हा कोहलीने कोणतीही चूक केली नाही.

या सामन्यात गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर गुजरातने आरसीबीचा 19.2 ओव्हरमध्ये 155 रनवर ऑलआऊट केला. आरसीबीकडून देवदत्त पडिक्कलने सर्वाधिक 40 रन केले. विराट या सामन्यात 28 रन करून आऊट झाला. विराटने रबाडाच्या एकाच ओव्हरमध्ये लागोपाठ 5 फोर मारल्या, त्यामुळे चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!