May 14, 2026 11:57 pm

२३ ड्रग्ज माफियांच्या मुसक्या आवळल्या, १.४ कोटींचा मुद्देमाल जप्त

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेत मीरा-भाईंदर, वसई-विरार (एमबीव्हीव्ही) पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या आठवडाभरात करण्यात आलेल्या धडक कारवाईत दोन परदेशी नागरिकांसह एकूण २३ जणांना अटक करण्यात आली आहे.

या कारवाईत सुमारे १ कोटी ४० लाख रुपये किंमत असलेले विविध प्रकारचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहिती नुसार , २० एप्रिल ते २६ एप्रिल या कालावधीत अमली पदार्थांची विक्री आणि सेवन करणाऱ्यांविरुद्ध ही विशेष मोहीम आखण्यात आली होती. परिमंडळ-१ मधील सर्व पोलीस ठाणी आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. या कारवाईदरम्यान १० दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, यात ९ भारतीय आणि २ परदेशी अशा ११ तस्करांना जेरबंद करण्यात आले आहे.

पोलिसांनी जप्त केलेल्या अमली पदार्थांमध्ये ३७४ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन), ३७० ग्रॅम गांजा, ९६.२९ ग्रॅम कोकेन, ८ ग्रॅम ब्राऊन शुगर आणि ३,२०० मिली कोडीनयुक्त कफ सिरपचा समावेश आहे. या मुद्देमालाची किंमत १ कोटी १० लाख ६७ हजार ५०० रुपये इतकी आहे.

याव्यतिरिक्त, अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांविरुद्धही १२ गुन्हे दाखल करून ९२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे, तर ५३ सराईत गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक पावले उचलण्यात आली आहेत. याच मोहिमेचा भाग म्हणून अमली पदार्थ विरोधी पथक आणि गुन्हे शाखेने आणखी आठ गुन्हे नोंदवत २९ लाख १८ हजार ७१८ रुपये किमतीचा साठा हस्तगत केला.

यात ७१२.७ ग्रॅम गांजा, ६० ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा, ३५.९ ग्रॅम हेरॉईन आणि १०९.९ ग्रॅम एमडीचा समावेश असून याप्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली आहे. अशा प्रकारे संपूर्ण मोहिमेत एकूण २३ आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!