हिंगोलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिरसम आणि पेडगाव रोडवर शेताजवळ एक मानवी सांगाडा आढलून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. एकाा ३० ते ३५ वर्षीय तरुणाचा हा सांगडा असल्याचं सांगितलं जात आहे.
सांगड्याजवळ एक कडं आढळलं आहे, त्यामुळे पोलिसांसमोर हा मृतदेह कुणाचा? याचा शोध लावण्याचा यशप्रश्न उभा ठाकला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या सिरसम ते पेडगाव रोडवर ही घटना उघडकीस आली आहे. यापेडगाव रोडवर एका छोट्या पुलाच्या बाजूला शेताजवळ एक मानवी सांगाडा शेतकऱ्यांना आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती तातडीने पोलिसांना घेण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ही माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. फॉरेन्सिक टीमचं पाचारण करण्यात आलं. या मानवी सांगाड्याची पाहणी केली असता. या सांगड्यावर काळ्या रंगाची अंडरवियर आहे. हातामध्ये स्टीलचे कडे मिळून आलं आहे. हा एक तरुणाचा मृतदेह आहे. अंदाजे 30 ते 35 वर्षे वयाचा पुरुषाचा सांगाडा असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. फक्त अंडरवेअर आणि स्टीलचं कड सापडल्यामुळे हा मृतदेह कुणाचा आहे, हे शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे.
याप्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, अज्ञात व्यक्तीचा हा सांगाडा आढळल्यामुळे परिसरात नागरिकात भीतीचे वातावरण पसरलं आहे आहे. याप्रकरणी पोलीस अधिक शोध घेत आहेत. या भागामध्ये आणि नजीकच्या गावामध्ये कुणी बेपत्ता असेल, कुणी हरवलं असेल तर हिंगोली पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.











