May 15, 2026 9:12 am

कोल्हापूर जिल्ह्यात १५ तरुणींचे लैंगिक शोषण; शिरोलीतील लॉजवर अत्याचार

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

सुमारे 15 पेक्षा अधिक निष्पाप तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील व्हिडीओ बनवण्यात आले, त्याद्वारे पीडितांना बदनामीची धमकी देत कोल्हापूर व शिरोली येथील लॉजवर नेऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली परिसरात घडला.

गेले काही दिवस जिल्ह्यात सुरू असलेल्या लव्ह जिहादचा संशय असलेल्या या प्रकरणामुळे जिल्हा हादरला. 20 वर्षीय पीडित तरुणीने रविवारी रात्री राजारामपुरी पोलिस ठाण्यात नराधमाविरुद्ध फिर्याद दिली.

पोलिसांनी हा गुन्हा हातकणंगले ठाण्याकडे वर्ग करताच पोलिसांनी पुलाची शिरोली येथील शाहीद समीर सनदी (वय 22) याच्या मुसक्या आवळल्या. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

सुरुवातीला हे प्रकरण केवळ वैयक्तिक वादाचे किंवा एका घटनेपुरते मर्यादित असल्याचे वाटत होते. मात्र, तपासात जे वास्तव समोर आले ते भयावह आहे. संशयिताने सोशल मीडियाचा वापर करून 18 ते 22 वयोगटातील तरुणींशी मैत्री केली आणि त्यांना प्रेमाच्या किंवा भावनिक जाळ्यात ओढले. या तरुणींवर अत्याचार करून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ बनवण्यात आले. त्यानंतर हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांचे मानसिक आणि शारीरिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. शिरोलीसह हुपरी, हातकणंगले आणि आजूबाजूच्या अनेक गावांतील तरुणी या जाळ्यात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

संशयित शाहिद फार्मसीचे शिक्षण घेत आहे. त्याच्या वडिलाचे किराणा दुकान आहे. तो मुलींना शिरोली व कोल्हापूर येथील लॉजवर बोलवून त्यांच्यावर अत्याचार करतानाचे चित्रीकरण करीत होता. अश्लील व्हिडीओतून तरुणींना बदनामी करण्याची धमकी देत होता.

ज्या पद्धतीने तरुणींना लक्ष्य करण्यात आले आहे, त्यावरून या कृत्यामागे एखादी मोठी संघटित टोळी कार्यरत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे आणि याचे कनेक्शन कोणाशी जोडलेले आहे, हे शोधण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. या प्रकरणाचे गांभीर्य वरिष्ठ पातळीवर घेण्यात आले आहे. अप्पर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी हातकणंगले पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून होते. आणखी कोणाची फसगत झाली असल्यास त्यांनी तातडीने तक्रार दाखल कराव्यात त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असेही पोलिसांनी सांगितले.

महिला अत्याचाराच्या निषेधार्थ मंगळवारी शिरोली गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानसह विविध संघटनांच्या वतीने शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे स.पो.नि. सुनील गायकवाड यांना निवेदन देण्यात आले असून, सायंकाळी जिल्हा पोलिसप्रमुखांची भेट घेऊन या प्रकरणाच्या सखोल तपासाची मागणी केली जाणार आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!