May 15, 2026 9:08 am

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, संशयित आरोपीनं पोलीस ठाण्यात संपवलं जीवन

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात आज सकाळी एक खळबळजनक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या रमेश गार्डी या आरोपीने पोलीस कोठडीतच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

या घटनेमुळे पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रमेश गार्डी याच्यावर एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना वडगाव निंबाळकर पोलिसांनी त्याला अटक केली होती. अटकेत असताना आज सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास आरोपीने पोलीस ठाण्याच्या कोठडीत गळफास घेतला.

पोलीस ठाण्यासारख्या सुरक्षित ठिकाणी आणि पोलिसांच्या पहारा असताना आरोपीने आत्महत्या केल्याने सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सकाळी जेव्हा ही घटना उघडकीस आली, तेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याला भेट दिली.

या प्रकरणात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांकडून काही निष्काळजीपणा झाला का? याची चौकशी आता केली जाणार आहे. सध्या आरोपीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, वरिष्ठ स्तरावरून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

आरोपीनं पोलीस कोठडीत नेमकी आत्महत्या कशी केली? गळफास घेण्यासाठी कशाचा वापर केला? आत्महत्येवेळी आरोपीसोबत कोठडीत आणखी कुणी होतं का? याची माहिती अद्याप समोर आली नाही. घटनेचा तपास सुरू आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!