April 24, 2026 4:11 pm

मोबाईल स्टेट्सवर अखेरचा मेसेज, काळजाचा थरकाप उडाला; त्यानंतर जे घडलं.

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील खडकी येथून दोन दिवसापासून गायब असलेल्या तरुणाचा मृतदेह आढळला आहे. राजगडच्या वरसगाव धरणाच्या बॅकवॉटरमध्ये या तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या तरुणाने दोन दिवसापूर्वी मोबाईलवर Everyone Sorry असा मेसेज ठेवला होता. त्यानंतर तो अचानक गायब झाला. त्यामुळे सर्वांच्याच काळजाचा थरकाप उडाला होता. त्याची शोधाशोध सुरू होती. त्यानंतर त्याचा थेट मृतदेहच आढळल्याने सर्वच हादरून गेले आहेत.

पुण्यातील खडकी येथून गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा, राजगड तालुक्यातील वरसगाव धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मृतदेह आढळला. अमर राजेंद्र कदम (वय 27) असं या युवकांच नाव आहे. हा तरुण गायब झाल्यानंतर खडकी पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी शोधाशोध केली असता त्याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पुण्यातील खडकीतील अमर राजेंद्र कदम (वय 27) हा युवक गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. याबाबत खडकी पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, साईव खुर्द परिसरातील वरसगाव धरणाच्या बॅकवॉटर भागात त्यांचे ओळखपत्र, कपडे, मोबाईल आदी वस्तू आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती साईव खुर्द येथील पोलीस पाटील रुपाली पंडीत यांनी संबंधित यंत्रणांना दिली. त्यानंतर हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. अध्यक्ष तानाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली टीम घटनास्थळी दाखल झाली. प्राथमिक पाहणीत संबंधित ठिकाणी पाण्याचा खोल प्रवाह असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार तातडीने शोधमोहीम राबविण्यात आली.

साईव खुर्द परिसरातील वरसगाव धरणाच्या बॅकवॉटर भागात त्यांचे ओळखपत्र, कपडे, मोबाईल आदी वस्तू आढळून आल्याने हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं होतं. त्यानंतर या टीमने खोल पाण्यात शोध घेतला. यावेळी त्याचा मृतदेह आढळून आला. त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याने ‘Everyone Sorry’ असा स्टेटस मोबाईलवर ठेवला असल्याची माहितीही समोर आली आहे. यावरून अमरने आत्महत्या करण्याचा निर्णय घेऊनच आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. पण त्याच्या आत्महत्या करण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

या कारवाईत पोलीस कर्मचारी अनिकेत सोनवणे, निवास जगदाळे, मंगेश कदम यांच्यासह हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमचे गणेश सपकाळ, संजय चोरघे, नारायण जावळकर, संतोष भगत आदींनी सहभाग घेतला. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली असून या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!