April 24, 2026 4:10 pm

एका संत्र्यामुळे दोन्ही किडन्या निकाम्या, मरणाच्या दारातून परतला आरजे सुमित

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

लोकप्रिय आरजे सुमित याने गेल्या काही दिवसांमध्ये अत्यंत गंभीर आरोग्य संकटाचा सामना केल्याची माहिती समोर आली आहे.दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली होती.

सुमित गेल्या काही दिवसांपूर्वी आयसीयूमध्ये उपचार घेत होता. डॉक्टरांनी त्याच्या जगण्याची खात्रीही दिली नव्हती, मात्र योग्य उपचार आणि जिद्दीच्या जोरावर सुमित या संकटातून सुखरूप बाहेर पडला आहे. नुकत्याच त्याने एका संकेतस्थळाला देलेल्या मुलाखतीत त्याने या थरारक अनुभवाबद्दल उलगडा केला असून, त्याच्या या संपूर्ण आजारामागे एक ‘संत्रं’ कारणीभूत ठरले, ज्यामुळे त्याची प्रकृती अचानक बिघडली.

आरजे सुमितने दिलेल्या मुलाखतीत सांगितले, त्यावेळी पेशंटचा मृत्यू होऊ शकतो, किंवा हार्ट अटॅक येऊ शकतो किंवा जास्त काळासाठी पेशंट कोमात जाऊ शकतो. असं डॉक्टरांनी सांगितले.

सुमितने पुढे सांगितले की, त्याचे रक्तदाब कोणत्याही प्रकारे नियंत्रणात येत नव्हते आणि आणि शरीरातील पाणी खूप कमी झाले होते.डॉक्टरांनी त्याला दारू किंवा स्टिरॉइड्स घेतात का, असे विचारले होते, पण त्याला अशी कोणतीही सवय नसल्याचे स्पष्ट केले. नंतरबायोप्सी केल्यानंतर धक्कादायक कारण समोर आले. सुमितला एका संत्र्यामुळे झालेल्या फूड पॉयझनिंगमुळे त्याला तीव्र डिहायड्रेशन झाले. त्यामुळे किडनीच्या नलिकांना (ट्यूब्सना) इजा झाली आणि दोन्ही किडन्या काम करणे थांबवले.डॉक्टरांनी तातडीने डायलिसिस करणे गरजेचे असल्याचे सांगितले होते, अन्यथा मृत्यू किंवा तो कोमात जाऊ शकतो.या कठीण काळात आरजे सुमिवर चार वेळा डायलिसिस आणि एक बायोप्सी करण्यात आली. उपचारांदरम्यान त्याने मोठा मानसिक आणि शारीरिक संघर्ष सहन केला.

नंतर त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे आभार मानले. तसेच त्याने एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे-“जेव्हा शरीरात काही त्रास जाणवतो, तेव्हा फक्त ब्लड टेस्टवर न थांबता किडनीची तपासणीही करून घ्यावी.”सुमितने भावनिक होत सांगितले की, आई-वडिलांचे आशीर्वाद आणि प्रेक्षकांचे प्रेम यामुळेच ते पुन्हा मायक्रोफोनसमोर परत येऊ शकले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!