आमचा ट्रस्ट ची स्थापना एप्रिल 2024 मध्ये झाली. ट्रस्ट च्या माध्यमातून आपण वेगवेगळे सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवत असतो.त्यापैकी काल झालेल्या कार्यक्रमात राजगड, हवेली व पुणे शहर येथील 10 वी 11 वी व 12 वी मधील 12 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5000 रुपये शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले. दरवर्षी ट्रस्टच्या माध्यमातून दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून स्कॉलरशिप दिली जाते. यावर्षी सुद्धा बारावी विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये मिस स्कॉलरशिप देण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राजगड पोलीस स्टेशनचे एपीआय किशोरजी शेवते तसेच सोशल अंडर फाउंडेशनचे संस्थापक संतोषी चोरगे एडवोकेट नितीनजी दसवडकर एडवोकेट विवेक शेळके दैनिक सकाळचे पत्रकार मनोज कुंभार तोरणा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री मुठे सर उपस्थित होते.
शिष्यवृत्ती वाटप करण्यासाठी एकूण 45 अर्ज प्राप्त झाले होते. पैकी 12 विद्यार्थ्यांची निवड शैक्षणिक गुणवत्ता, एकल पालक, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती या आधारे व प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची माहिती घेण्यात आली होती. काल झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सोशल हंड्रेड फाउंडेशनचे संस्थापक संतोषी चोरगे होते व प्रमुख पाहुणे किशोरजी शेवते यांच्या हस्ते 12 विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची धनादेश वाटप करण्यात आले.
प्रास्ताविक करताना शेखर शिंदे यांनी *सदर उपक्रमाची सविस्तर माहिती विद्यार्थी व पालकांना करून दिली. समाजातील विविध समस्या ओळखून त्यावर सकारात्मक पद्धतीने काम करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विशेषतः जे तरुण आपल्या आयुष्यात स्थिर झाले आहेत, त्यांनी आपल्या मागील पिढीच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक अडचणी दूर करण्यासाठी सक्रियपणे हातभार लावण्याची आजच्या काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.*
याप्रसंगी बोलताना किशोरजी शेवते म्हणाले की “*गरिबी हा शैक्षणिक क्षेत्रातील अडथळा कधीही ठरता कामा नये समाजामध्ये शिवाजी शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट सारख्या संस्था अत्यंत उत्कृष्ट काम करत आहेत व विद्यार्थ्यांना मदत करत आहेत त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ आर्थिक मदत न देता त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम शिवाजी शिंदे चारिटेबल ट्रस्ट करत आहे हे खूप कौतुकास्पद आहे”*.
अध्यक्ष भाषण करताना संतोषी चोरगे म्हणाले की *”देशाचे भवितव्य हे आताच्या तरुण पिढीच्या हातात आहे तेव्हा तरुण पिढीने योग्य प्रकारे शिक्षण घेऊन आपल्या परिस्थितीवर मात करून आपल्या तालुक्याचा आपल्या गावाचं नाव रोशन करावे तसेच प्रत्येक गावातून गावागावातून अधिकारी तयार व्हावेत यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत”*.
तोरणा विद्यालय वेल्हे येथे झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुतूहल सर यांनी केले. नितीनजी दसवडकर व मनोजजी कुंभार यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना अशा कार्यक्रमांची समाजाला सक्त गरज असल्याचे नमूद केले. तोरणा विद्यालयाचे प्राचार्य मुठे सर यांनी आभार प्रदर्शन केले.
याप्रसंगी शिवाजी शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकर्ते प्रवीण शिंदे, प्रतीक शिंदे, गणेश शिंदे, वैभव पारठे, नाना शिंदे, स्वप्नील कांगडे व मकरंद चावट यांनी मोलाचे सहकार्य केले.










