April 23, 2026 5:12 pm

*मतदान केलं आणि मुंबईला निघाले, वरंधा घाटात कार कोसळली

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या मतदानासाठी मुंबईवरून महाडला गेलेल्या चार जणांनी परत येताना मृत्यूला चुकवलं. महाडला मतदान करून चौघे कारने परत मुंबईला निघाले पण, वरंधा घाटात कार अनियंत्रित झाली आयुष्यभर आठवणीत राहील अशी घटना घडली.

चौघांवर झडप घालायला काळ आला, पण त्यांनी काळाला चकवत कारमधून उड्या मारल्या आणि जीव वाचवला. तर कार खोल दरीत जाऊन पडली.

भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात ही घटना घडली. कार महाडवरून भोरच्या दिशेने येत होती. घाटात असलेल्या शिरगावच्या हद्दीत एका धोकादायक वळणावर येताच चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले.

दरीत कोसळण्याआधी कारमधून बाहेर उड्या मारल्या

कार दरीच्या दिशेने जात असतानाच आत बसलेल्यांना अंदाज आला की आपणही दरीत कोसळणार. अवघ्या काही क्षणात चौघांनीही लगेच कारचे दरवाजे उघडले आणि बाहेर उड्या मारल्या.

चौघेही दरीच्या सुरुवातीला असलेल्या झाडीत पडले. अवघ्या काही क्षणात घेतलेल्या निर्णयामुळे चौघाचेही जीव वाचले. चौघे किरकोळ जखमी झाले, पण दैव बलवत्तर म्हणून कोणतीही प्राणहानी झाली नाही.

मतदान करून येताना चुकला काळजाचा ठोका

अपघातातील चौघेही हे मूळचे महाड तालुक्यातील रहिवाशी आहेत. ते मुंबई राहतात. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवारी मतदान पार पडले. मतदानासाठीच चौघेही मुंबईवरून कारने गावी गेले होते.

मतदान केल्यानंतर चौघेही परत मुंबईला निघाले होते. पण, वरंधा घाटात त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. धावत्या कारमधून बाहेर उडी मारल्यामुळे चौघेही किरकोळ जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!