April 23, 2026 6:36 pm

*शहराभोवती चार कोचिंग टर्मिनल उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे रेल्वे स्थानकावरील दिवसेंदिवस वाढत चाललेला प्रवासी ताण लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने पुढील २० ते ३० वर्षांचा दूरदृष्टीकोन ठेवत शहराभोवती चार स्वतंत्र रेल्वे टर्मिनल उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. यामध्ये हडपसर आणि खडकी येथील टर्मिनलचे काम अंतिम टप्प्यात असून, उरुळी आणि आळंदी येथील स्थानकांवर लवकरच कामास सुरुवात होणार आहे. या चारही ठिकाणी मेगा कोचिंग टर्मिनल विकसित केले जाणार असून, पुणे लवकरच बहु-टर्मिनल रेल्वे जंक्शन म्हणून उदयास येणार आहे.

पुणे स्थानक अपुरे; पर्याय म्हणून उपनगरांमध्ये टर्मिनल

पुणे शहराचा झपाट्याने वाढणारा विस्तार, आयटी हब म्हणून वाढलेले महत्त्व आणि वाढती लोकसंख्या यामुळे पुणे रेल्वे स्थानकावर प्रचंड प्रवासी ताण आहे. सध्याची फलाट क्षमता, पार्किंग व्यवस्था आणि जागेची मर्यादा पाहता पुणे स्थानकाचा अधिक विस्तार करणे शक्य नसल्याने, पुण्यालगतच्या छोट्या स्थानकांचा टर्मिनल म्हणून विकास करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

याच धोरणाअंतर्गत उरुळी आणि आळंदी येथे मोठ्या प्रमाणावर कोचिंग टर्मिनल उभारले जाणार असून, त्यामुळे पुणे स्थानकावरील ताण लक्षणीयरीत्या कमी होणार आहे.

देशातील सर्वाधिक रेल्वे प्रकल्प पुण्यात?

मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात सुरू असलेल्या रेल्वे पायाभूत प्रकल्पांमध्ये पुणे विभागात सर्वाधिक काम प्रस्तावित आहे. नवीन रेल्वे मार्ग, फलाट विस्तार, कोचिंग टर्मिनल, पिटलाईन आणि देखभाल केंद्र यावर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे.

‘कोचिंग टर्मिनल’ का आवश्यक?

रेल्वे मंत्रालयाने येत्या पाच वर्षांत देशभरातील रेल्वे गाड्यांची वेटिंग लिस्ट संपवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर नवीन रेल्वेगाड्या सुरू कराव्या लागणार असून, त्यासाठी—

रेल्वे मार्गांची क्षमता वाढवणे

नवीन फलाट उभारणे

कोचिंग टर्मिनलची संख्या वाढवणे

अत्यावश्यक ठरणार आहे. पुण्याहून अधिक गाड्या सुरू करण्यासाठी पुणे स्थानकाच्या बाहेर स्वतंत्र कोचिंग टर्मिनल उभारण्याशिवाय पर्याय नसल्याने, रेल्वे बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.

कोचिंग टर्मिनलचे महत्त्व काय?

नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्यापूर्वी त्यांच्या नियमित देखभाल व दुरुस्तीची स्वतंत्र व्यवस्था असणे गरजेचे असते. ही कामे प्रवासी स्थानकावर करणे शक्य नसते. कोचिंग टर्मिनलमध्ये—

रेल्वे डब्यांची स्वच्छता

डब्यांचे धुणे

बॅटरी चार्जिंग

दुरुस्ती व देखभाल

पिटलाईनवरील तांत्रिक कामे

या सर्व सुविधा एका ठिकाणी उपलब्ध असतात. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षित कर्मचारी कार्यरत असतात.

प्रवाशांना थेट फायदा

उरुळी आणि आळंदी येथे उभारण्यात येणाऱ्या मेगा कोचिंग टर्मिनलमुळे भविष्यात पुण्याहून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. परिणामी—

तिकीट वेटिंग कमी होणार

नवीन लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू होणार

पुणे स्थानकावरील गर्दी कमी होणार

प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा मिळणार

असा थेट फायदा पुणे आणि परिसरातील लाखो प्रवाशांना होणार आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!