April 23, 2026 9:18 pm

*क्षणात होत्याचं नव्हतं झालं, पुण्यात तरुणाचा जागीच कोळसा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे शहरातील मित्रमंडळ चौक परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून एका तरुणाचा होरपळून मृत्यू झाला आहे.रस्त्याने जात असताना केलेल्या एका चुकीमुळे हा भीषण अपघात घडला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मित्रमंडळ चौक परिसरात महावितरणचा वीजपुरवठा करणारा एक मोठा डीपी बॉक्स आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा डीपी बॉक्स नेहमी कुलूप लावून बंद ठेवण्यात येतो. मात्र संबंधित तरुणाने कोणत्या तरी साधनाच्या मदतीने या डीपी बॉक्सचे कुलूप तोडले. त्यानंतर त्याने आत असलेल्या उघड्या विद्युत तारांना हात लावला. या तारांमध्ये उच्च दाबाचा वीजप्रवाह सुरू असल्याने त्याला जोरदार विजेचा झटका बसला.

वीज लागल्याने काही क्षणातच आगीचा भडका उडाला आणि तरुण गंभीररीत्या होरपळला. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. त्याने सुरक्षित असलेला डीपी बॉक्स फोडून आत का हात घातला, तो चोरीच्या उद्देशाने गेला होता की इतर कोणते कारण होते, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करण्यात आला.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे घटनेचा तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तसेच तरुणाची ओळख पटवण्यासाठी आणि या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!