April 23, 2026 9:20 pm

*फोर्थ सीटवरुन प्रवाशांत वाद; दोघांच्या भांडणात तिसऱ्याने गमावला डोळा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

विलंबाने आलेल्या लोकलमध्ये चौथ्या आसनावर बसण्याच्या वादावरून दोन प्रवाशांमध्ये वाद झाला. या वादातून गाडीतून उतरलेल्या एका प्रवाशाने अन्य प्रवाशांवर दगडफेक सुरू केली. यातील पहिला दगड चुकला, मात्र दुसरा दगड निशांत खत्री या प्रवाशाच्या डोळ्याला लागला.

यामुळे त्यांचा डोळा निकामी होण्याची भीती व्यक्त होत आहे. वांद्रे रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी आरोपी योगेंद्र बौद्ध याला अटक केली आहे.

निशांत खत्री यांनी मंगळवारी अंधेरी रेल्वे स्थानकातून रात्री १०.४० वाजता चर्चगेट फास्ट लोकल पकडून दादरच्या दिशेने प्रवास सुरू केला. गाडीत गर्दी असल्याने त्यांना तिसरे आसन मिळाले. त्याचवेळी आरोपी तेथे पोहोचला. चौथ्या आसनावर बसताना त्यांच्यात वाद सुरू झाला. दोघांमध्ये शाब्दिक खटके उडत असताना लोकल रवाना झाली.

वांद्रे स्थानकाच्या फलाट क्रमांक पाचवर लोकल येईपर्यंत त्यांच्यातील वाद चिघळला. आरोपीने लोकलमधून रुळांवर उडी घेतली आणि रुळांलगत असलेले दगड निशांत यांच्या दिशेने भिरकावण्यास सुरुवात केली. यातील पहिला दगड डब्याला लागला. मोठा आवाज झाल्याने प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली. मात्र दुसरा दगड निशांत यांच्या डोळ्याला लागला व ते गंभीर जखमी झाले.

निशांत यांना लोकलमधून उतरवून फलाटावरील रात्रपाळीतील रेल्वे पोलिस अंमलदारांनी १०८ रुग्णवाहिकेतून तातडीने भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दुसरीकडे, वांद्रे रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीनुसार आरोपी दादर परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वांद्रे रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा आखून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीने दगडफेक केल्याची कबुली दिली आहे.

३६ तासांत अटक

आरोपी पालघरमधील वसई पूर्वेतील नवघर येथील रहिवासी आहे. तो बांधकामस्थळी मजुरी करून उदरनिर्वाह करत असल्याची माहिती चौकशीत समोर आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वांद्रे रेल्वे पोलिस ठाणे, शहाजी निकम, पोलिस उपनिरीक्षक एम. बी. बच्छाव आणि गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या ३६ तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या.

वाढत्या घटनांमुळे चिंता

डिसेंबर २०२५ – मध्य रेल्वेत गर्दीच्या लोकलमध्ये दरवाजात उभे राहण्यावरून दोन गटांत हाणामारी; एका प्रवाशाच्या डोक्याला दुखापत.

जानेवारी – पश्चिम रेल्वेवरील स्थानकात उतरण्याच्या घाईत झालेल्या वादातून धक्काबुक्की; महिला प्रवासी जखमी.

जानेवारी २०२६ – मालाड रेल्वे स्थानकात लोकलमधून उतरताना झालेल्या गर्दीच्या वादातून एका ३३ वर्षीय प्राध्यापकाची (अलोककुमार सिंह) हत्या

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!