April 23, 2026 10:58 pm

*जळगावमध्ये प्रत्येक ९ व्या मिनिटाला पोलिसांची धडक; ‘डायल ११२’चा डंका

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

तत्काळ मदतीसाठी वापरात असलेल्या डायल-११२ या हेल्पलाइन क्रमांकावर मदतीसाठी दिवसभर नागरिकांचा संपर्क सुरुच असतो. प्रत्येक कॉल हा त्या-त्या भागातील पोलिस वाहनावर बंधनकारक असल्याने अवघ्या नवव्या मिनिटात पोलिस आपत्ती प्रसंगी मदतीला हजर आहे.

यातून अपघातस्थळी जखमींना तत्काळ मदत, वादविवादप्रसंगी कायद्याची जरब आणि इतर गुन्हे घडण्यापासून वाचविण्यासोबतच संशयिताना अटकेसाठी याचा उचित वापर होत आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२५ या १२ महिन्यांच्या कालावधीत ‘डायल-११२’ या हेल्पलाइनवर २१ हजार १७८ कॉल आले. त्या ठिकाणी सरासरी नऊ मिनिटांत पोलिस पोहोचले.

डिसेंबरमध्ये सर्वाधिक कॉल

सन २०२५ या वर्षात डायल ११२वर २१ हजार १७८ कॉल आले आहेत. हे कॉल आल्यानंतर संबंधित कार्यक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना माहिती देऊन मदत करण्यात आली. वर्षभरातील एकूण कॉलपैकी सर्वाधिक दोन हजार ८४९ कॉल डिसेंबर महिन्यात आले.

सरासरी नऊ मिनिटे

ऑनलाइन पद्धतीने कार्यरत असलेल्या डायल ११२ यंत्रणेवर एखाद्याने संपर्क केल्यानंतर सरासरी नऊ मिनिटांत कॉल करणाऱ्यांच्या मोबाईल लोकेशनवर पोलिस धडकले आहेत.

हाणामाऱ्यांचे कॉल अधिक

पोलिस हेल्पलाइन डायल-११२ वर घरगुतीछळ, मुली-महिलांची छेडखानी, पतीकडून मारहाण, अपघात, गोंधळ, वाहतूक कोंडी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी येतात. गेल्या वर्षभरात (२०२५) सर्वाधिक आठ हजार ३२० तक्रारी या हाणामारी, कायदा व सुव्यस्थेशी निगडीत स्वरुपाच्या होत्या.

९८ टक्के कॉल पूर्ण

डायल-११२ ही यंत्रणा पूर्णतः ऑनलाइन पद्धतीने कार्यरत असून, मदत मागणारा व मदतीसाठी गेलेले पोलिस यांच्यावर तिसरीच व्यक्ती नजर ठेवते व मदत मिळाली किंवा नाही याची नोंदही घेण्यात येते. इतकेच काय तर, मदत मागणारा समाधानी झाला किंवा नाही, याची नोंदही ठेवली जाते. परिणामी, वर्षभरात एकूण संपर्कांपैकी ९८ कॉल्स पूर्ण करण्यात आले आहेत.

१४६ बोगस कॉल

काहींना कुरापत काढावी म्हणूनही फोन करायचा असतो, तर काहींना खरोखर पोलिस दखल घेतात की नाही, याची चाचपणी करायची असते म्हणून डायल ११२ वर अनेक वेळा बोगस कॉलही येत असतात. त्यानुसार जानेवारी ते डिसेंबर २०२५ या काळात १४६ बोगस कॉल आले.

बारा महिने २४ तास कार्यरत सेवा

कोणताही दिवस असो, दिवस-रात्र २४ तास आणि वर्षाचे बाराही महिने, पोलिस दलाची हेल्पलाइन डायल-११२ पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, मदतीसाठी संपर्क झाल्याबरोबर त्याला पोलिस मदत मिळणार म्हणजे मिळणार, याची शंभर टक्के खात्री असल्याने जास्तीत जास्त नागरिक आता याचा वापर करू लागले आहेत.

मदतीसाठी डायल करा ११२

नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ मदत हवी असल्यास ११२ हा हेल्पलाइन क्रमांक डायल करावा. विशिष्ट यंत्रणेच्या साहाय्याने एका ठिकाणी फोन लावल्यावर अवघ्या काही सेकंदात हा फोन कोठून आला, हे संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना कळते. त्यानंतर पोलिस नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल, महिला हेल्पलाइन, चाईल्ड हेल्पलाइन यांना कॉलची माहिती दिली जाते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!