April 23, 2026 4:58 pm

*मांजरा धरणाच्या रॅम्पला गळफास घेऊन धारुर आगाराच्या चालकाने संपवले जीवन

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

धारूर एसटी आगारात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना केज तालुक्यातील धनेगाव येथे घडली आहे. आत्मलिंग नामदेव गुजर (वय — वर्षे), रा. धनेगाव, ता. केज, जि. बीड असे मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

रविवारी सायंकाळच्या सुमारास धनेगाव येथील मांजरा धरणाच्या डाव्या कालव्याच्या रॅम्प परिसरात ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.

या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मयत आत्मलिंग गुजर यांच्या चुलत भावाने, विश्वनाथ रामलिंग गुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून युसुफवडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार डोंगरे करीत आहेत. पुढील तपास सुरू असून मृत्यूमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.

या घटनेमुळे एसटी कर्मचारी वर्गासह धनेगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!