April 23, 2026 4:54 pm

*कोल्हापूरात तरुण चालकाने वाहनांना उडवले

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

चुकीच्या दिशेने निघालेल्या भरधाव मोटारीने चार वाहनांना उडवले. हा वांधारक अवघ्या १९ वर्षाचा असल्याचे सांगण्यात येते..येथील शाहू मिल चौकात घडलेल्या या अपघातात मुलगी व वडील ठार झाले.

तर दोघेजण जखमी झाले आहेत. धडकेत दुचाकीचा चक्काचूर झाला होता.

अपघातानंतर लोकांनी चालकाला बेदम मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी चालक मयुरेश पाटील याला ताब्यात घेतले आहे. मयुरेश हा राजारामपुरी येथून मोटारीने जात असताना दोन गाड्यांना ठोकले. त्यात एक रिक्षा चालक होता. रिक्षा चालकाने पाठलाग सुरू केल्यावर मयुरेशने क्रेटा मोटार सुसाट पळवली.

शाहू मिल चौकात आल्यावर तो चुकीची दिशेने जात होता. अशातच त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकीवरून जात असलेल्या मुली व वडिलांना जोरदार धडक बसली. त्यात वकील भाग्यश्री लक्ष्मण वंशे गवळी ( वय ३०,) , महापालिकेतील आरोग्य विभागातील सेवानिवृत्त दीपक महादेव वंशे (वय ६५) यांचा मृत्यू झाला. वडील आणि मुलगी हे ठार झाले आहेत.

दिलबर तालीम मंडळ जवळील सनगर गल्ली येथे राहत होते. भाग्यश्रीचा विवाह दीड वर्षांपूर्वी झाला आहे. सध्या ती कसबा बावडा येथे राहत होती.धनंजय करजगार व केवळ उदय नाईक हे दोघे जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!