April 23, 2026 3:32 pm

*मध्यरात्री मोठी घडामोड, १२ वाजता खासदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

शुक्रवारी रात्री बिहारच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांना पोलिसांनी मध्यरात्री १२ वाजता अटक केली.

३१ वर्षे जुन्या प्रकरणात  पाटणा पोलिसांनी पप्पू यादव यांना अटक केली. १९९५ मध्ये भाड्याने घेतलेल्या पाटण्यातील एका घरावर कब्जा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पप्पू यादव यांनी प्रथम भाड्याच्या घरात आपले कार्यालय उघडले आणि नंतर ते घर ताब्यात घेतले. या प्रकरणात घरमालकाने त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. शुक्रवारी रात्री त्यांना पोलिसांनी अटक केली.

पप्पू यादव यांच्यावर १९९५ मध्ये घर हडपल्याचा  आरोप आहे. त्यांच्याविरोधात बीएनएस अंतर्गत 419, 420, 468, 448, 506 आणि 120बी, त्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोर्टाने अटक करण्याच्या सुचना दिल्यानंतर रात्री १२ वाजता अटक केली. सकाळी त्यांना मेडिकल चेकअपसाठी रूग्णालयात नेहण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पप्पू यादव यांना अटक केल्यानंतर समर्थक आक्रमक झाले होते. शुक्रवारी रात्री पोलिस आणि खासदाराच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद आणि बाचाबाची झाली. पोलिसांनी पप्पू यादव यांना अटक केली, त्यानंतर समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

शुक्रवारी रात्री पप्पू यादव यांच्या कार्यालय आणि घराबाहेर जोरदार राडा झाला. पोलीस पप्पू यादव यांना अटक करण्यासाठी आले त्यावेळी समर्थकांनी घोषणाबाजी केली. पप्पू यादव यांनी पलिसांना अटक वॉरंट विचारले. कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही अटक करण्यासाठी आलो आहोत, असे पोलिसांकडून त्यांना सांगण्यात आले. ३५ वर्षे जुन्या प्रकरणात कोर्टाने त्यांचा जामीन रद्द केला होता, त्यानंतर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. खासदार पप्पू यादव यांनी आरोप केला की, कोणतीही पूर्वसूचना किंवा वॉरंट देण्यात आले नाही. रात्री उशिरा पोलिस अचानक अटक करण्यासाठी आले. दरम्यान, पाटणा शहराचे एसपी भानु प्रताप सिंह स्वतः पप्पू यादव यांना अटक केली. पोलिस खासदारांना घेऊन जात होते, त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला.

३५ वर्षे जुन्या प्रकरणात कोर्टाने पप्पू यादव यांना अनेकदा समन्स बजावले होते. पण ते हजर राहिले नाहीत. कोर्टाने त्यांचा जामीन रद्द केला अन् मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. कोर्टाकडून खासदार यादव यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. कोर्टाच्या आदेशानंतर शुक्रवारी रात्री पोलिसांनी पप्पू यादव यांना अटक केली. आज सकाळी त्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, बिहार सरकार आणि गृहमंत्री सम्राट चौधरी त्यांना NEET विद्यार्थ्यासाठी लढल्याबद्दल धमक्या देत आहेत, असा आरोप याआदी खासदाराने केला होता. उपमुख्यमंत्र्यांना माझी हत्या करायची आहे, असा रोपही त्यांनी आज तकशी बोलताना केला होता.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!