April 23, 2026 5:29 pm

*सराईत गुन्हेगार अखलाक शेखला अकोला कारागृहात स्थानबद्ध

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर पोलिस ठाण्याकडून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ठाण्याच्या अभिलेखावरील आरोपी अखलाक शेख याच्यावर एमपीडीए कायदयांतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली .

आरोपी शेख याची रवानगी मध्यवर्ती कारागृह अकोला या ठिकाणी करण्यात आली असल्याची माहिती जुन्नर पोलिस ठाण्याकडून देण्यात आली.

याबाबत पोलिस ठाण्याकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हणले आहे की, पोलिस अधीक्षक संदीप गिल यांनी सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरीता वारंवार गुन्हे करणारे सराईत आरोपी, आरोपींची टोळी यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले होते. त्यानुसार जुन्नर पोलीस स्टेशन अभिलेखावरील असलेला सराईत आरोपी अकलाक आसिफ शेख रा. कागदीवाडा जुन्नर ता. जुन्नर जि. पुणे याच्यावर महाराष्ट्र झोपडपटटी गुंड, हातभटटीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणा-या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट), वाळु तस्कर व अत्यावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणारे व्यक्ती, बेकायदेशीर जुगार, बेकायदेशीर लॉटरी चालवणा-या आणि अपव्यापार करणा-या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत असलेल्या कलमानुसार शेख याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आला होता. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शेख याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृह अकोला जि. अकोला येथे करण्यात आली आहे.

यापुर्वी देखील जुन्नर पोलीस स्टेशन कडुन सोयाबिन चोरीने संपुर्ण जुन्नर तालुक्यात धुडगुस घालणारी सुनिल मोहन काळे, वय. २६ वर्षे, रा. तलाखी, कुसुर, ता. जुन्नर जि. पुणे. (टोळी प्रमुख) व त्याचे इतर चार साथीदारांच्या टोळीला दोन वर्षांकरिता पुणे, ठाणे व अहिल्यानगर जिल्हयातुन हददपार करण्यात आले आहे. जुन्नर शहरात गोवंश वाहतुक व कत्तल करणारे आरोपी नाजीम रज्जाक बेपारी व फारूक अब्बास कुरेशी यांना संपूर्ण पुणे जिल्हयातुन एक वर्षाकरीता हददपार करण्यात आले आहे. यासोबतच शहरातील सुरज जयसिंग परदेशी याला संपुर्ण पुणे जिल्हयातुन एक वर्षाकरीता हददपार करण्यात आले आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने शंभरहुन अधिक आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदिप सिंह गिल, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांचे आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, जुन्नर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किरण अवचर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश तिटमे, महेश बनकर, श्रीराम शिंदे, विशाल चौधरी यांच्या पथकाने केली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!