April 23, 2026 3:56 pm

*आकाेल्यातील महिलेवरील अत्याचाराविरोधात हिंदू संघटना एकवटल्या

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

अक्कलकोट शहरातील गजबजलेल्या गांधी रोडवर उघडकीस आलेल्या एका गंभीर आणि संतापजनक अत्याचार प्रकरणानंतर बुधवारी (ता.४) विविध हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. आरोपीकडून महिलेवर फसवणूक, अत्याचार तसेच धर्मांतराचा दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप झाल्यानंतर या प्रकरणाचे पडसाद उमटले.

दरम्यान, संबंधित घटनास्थळ असलेले ‘परी बिंदी घर’ आणि आजूबाजूची अवैध अतिक्रमणे तात्काळ हटविण्याची मागणी झाल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने बुधवारी दुपारीच घटनास्थळासह चार दुकाने हटवली. या कारवाईदरम्यान परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस प्रशासनाच्या उपस्थितीत मनपाने ही कारवाई पार पाडली.

अत्याचाराच्या घटनेविरोधात बजरंग दल, हिंदू जनजागरण समिती, विश्व हिंदू परिषद यांसह विविध हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून, त्यांनी सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यानुसार आरोपी व त्याच्या आजूबाजूला असलेली दुकाने हटविण्याची मागणी केली होती. गांधी रोडवरील ‘परी बिंदी घर’ हे दुकान गुन्ह्याचे मुख्य ठिकाण असल्याचे पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. बुधवारी विविध हिंदू संघटनांनी उपमहापौर अमोल गोगे यांची भेट घेत संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर आयुक्त डॉ.सुनील लहाने यांची हिंदू संघटनांचे पदाधिकारी यांनी भेट घेत गांधी रोडवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. या अतिक्रमणाचा वापर करून महिलांना फसवणे, त्यांची छेडछाड करणे आणि अवैध कृत्ये केली जात असल्याचे बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे. मनपा प्रशासनाकडून घटनास्थळ व आजूबाजूची सर्व चार ते पाच दुकाने हटविण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस बंदोबस्तात ही कारवाई पार पाडण्यात आली.

हिंदू संघटना आक्रमक

या घटनेनंतर बजरंग दल, हिंदू जनजागरण समिती, विश्व हिंदू परिषद आदी संघटनांनी एकत्र येत मनपा आयुक्तांना निवेदन दिले. गांधी रोडवरील ‘परी बिंदी घर’ हे दुकान आणि त्याच्या आजूबाजूची सर्व अवैध अतिक्रमणे तात्काळ हटविण्याची मागणी त्यांनी केली. संघटनांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट शब्दांत इशारा देण्यात आला होता की, अशा प्रकारच्या अतिक्रमणांमुळे महिलांवरील अत्याचाराचे प्रकार वाढत असून, वेळीच कठोर कारवाई न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले होते.

महिलेवरील घडलेली घटना अत्यंत चुकीची व निदंनीय आहे. यात सहभाग असलेल्या आरोपीला कुठेही थारा दिला जाणार नाही तसेच कठोरात कठोर कारवाई केली जाईल. कायदेशीर पद्धतीने सर्व अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात येणार आहे. पुढील तीन ते चार दिवसांत कारवाई आणखी तीव्र केली जाईल.

मनपा प्रशासनाकडून तातडीने दखल

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत महानगरपालिका आयुक्तांनी तात्काळ संबंधित विभागाला कारवाईचे आदेश दिले. बुधवारी दुपारी मनपाच्या अतिक्रमण पथकाने गांधी रोड परिसरात धडक कारवाई करत ‘परी बिंदी घर’सह आजूबाजूची पाच दुकाने जमीनदोस्त केली. कारवाईदरम्यान पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

पीडित महिलांनी समोर यावे

या प्रकरणात पीडित असणाऱ्या महिलांची संख्या जास्त असल्याचे यावेळी बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र, बदनामी होईल, या भीतीपोटी महिला समोर येत नसल्याचे वास्तव आहे. पीडित महिलांनी समोर यावे असे आवाहन बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केले. तसेच जोपर्यंत अतिक्रमण पूर्णत: हटविण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचेही यावेळी सांगितले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!