May 13, 2026 10:30 pm

*घोडबंदर रोडवर पकडला दोन किलो २८८.६ ग्रॅम हेरॉईन

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

अमली पदार्थ तस्करीविरोधी मोहिमेत पोलिसांना मोठे यश आले आहे. घोडबंदर रोडवरील गायमुख परिसरात सापळा रचून ठाणे खंडणी विरोधी पथकाने एका रिक्षाचालकाला अटक केली असून, त्याच्याकडून दोन किलो २८८.६ ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त केले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या अमली पदार्थाची किंमत सुमारे दोन कोटी २५ लाख ९१ हजार ५५० रुपये इतकी आहे.

पालघर जिल्ह्यातील फरदिन गुलजार मुल्ला (५०) हा रिक्षाचालक परराज्यातून हेरॉइन घेऊन विक्रीसाठी गायमुख परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती खंडणी विरोधी पथकाचे हवालदार आशीष ठाकूर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रविवारी (ता. १) गायमुख जकात नाक्याजवळ सापळा रचला. पायी चालत येणाऱ्या संशयित फरदिन मुल्ला याला ताब्यात घेऊन त्याच्या बॅगेची झडती घेतली असता, त्यात सव्वादोन कोटींचे हेरॉइन आढळून आले.

दिवा-खर्डीनंतर मोठी कारवाई

काही दिवसांपूर्वीच दिवा-खर्डी भागात एक किलो ७३६ ग्रॅम हेरॉइन पकडण्यात आले होते. ती घटना ताजी असतानाच पोलिसांनी ही दुसरी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, या तस्करीमागे आणखी कोणाचे हात आहेत, याचा शोध पोलिस घेत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!