May 13, 2026 10:25 pm

*महामार्गाच्या थांबलेल्या कामास प्रारंभ

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शहराअंतर्गत खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटलपर्यंतच्या ५०० मीटर महामार्गाच्या कामास प्रारंभ झाला आहे. त्यापैकी बीड कार्नर ते समर्थ हॉस्पिटलपर्यंतचे ३८० मीटर लांबीचे काम महिन्याभरात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

शहरातील कोठारी पेट्रोलपंप ते बीड रस्त्यावरील सौताडा घाटापर्यंतचे १३ किलोमीटर लांबीचे काम जवळपास पूर्ण झाले असले, तरी शहराअंतर्गत केवळ पाचशे मीटर लांबीचे काम प्रलंबित होते. हे काम पुण्याच्या धनेश्वर कन्स्ट्रक्शनमार्फत करण्यात येत आहे. या महामार्गाच्या कामास तीन वर्षांपूर्वी प्रारंभ झाला होता. मात्र, शहराअंतर्गत अतिक्रमणाचा मुद्दा कळीचा ठरल्याने यामध्ये रस्ता करताना वारंवार अडथळे येत होते. याप्रश्नी विविध संघटनांच्या वतीने आंदोलने झाली. मात्र, कधी ठेकेदारांचा हलगर्जीपणा, तर कधी लोकांच्या तक्रारी यामध्ये हे काम प्रलंबित रहात होते.

दरम्यान, नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी व नगरसेवकांनी संबंधित महामार्गाचे अधिकारी आणि ठेकेदारांसमवेत याप्रश्नी तहसीलदार धनंजय जाधव यांच्या दालनात बैठक घेतली. त्याचबरोबर महामार्गाचे काम तातडीने सुरू व्हावे, यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हेही कायम आग्रही राहिले. बहुतांशवेळा त्यांनी समन्वयकाची भूमिका पार पाडली.

या महामार्गाच्या कामास १४ जानेवारी २०२३ रोजी कार्यारंभ आदेश मिळाला होता. मात्र, हे काम प्रलंबित राहिल्याने, गेल्या तीन वर्षात या रस्त्यावर बरेच अपघात घडले. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला, तर अनेकांना मोठी दुखापत झाली होती. आता या कामास पुन्हा प्रारंभ झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

शाळा भिंतीचा पेच

शहरांतर्गत खर्डा चौक ते बीड कार्नरपर्यंतच्या १२० मीटर लांबीच्या रस्त्याचा पेच अद्याप सुटलेला नाही. हा रस्ता करताना शाळेची संरक्षक भिंत हटवून रस्ता करण्याचे नियोजन आहे. १२० मीटर लांबीमध्ये ७० मीटर लांब शाळेच्या भिंत आहे.

– प्रांजल अमित चिंतामणी, नगराध्यक्षउर्दू शाळेच्या भिंतीसंदर्भातील विषय सर्वांना विश्वासात घेतानाच, समन्वयातून मार्ग काढून, येत्या दोन महिन्यांत शहराअंतर्गत महामार्गाचे काम पूर्ण करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!