May 13, 2026 10:25 pm

*वडणगे परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

वडणगे (ता. करवीर) येथील सासने मळा, शिव-पार्वती कॉलनी तसेच विजय हौसिंगी सोसायटी परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी करत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विजय हौसिंगी सोसायटी येथील सतीश यादव हे कुटुंबियांसह काही दिवसांसाठी परगावी गेले होते. शनिवारी ते घरी परतल्यानंतर त्यांना घराचा मुख्य दरवाजा उघडा असल्याचे आढळून आले. घराची पाहणी केली असता, कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले.

त्याचप्रमाणे सासने मळा परिसरातील दीपक कोपल हेही कुटुंबासह त्यांच्या मूळ गावी गेले होते. शनिवारी सकाळी घरी परतल्यानंतर त्यांच्या घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी त्यांच्या घरातून एक तोळा सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने तसेच सुमारे ४० हजार रुपये रोख रक्कम लंपास केली होती. याबाबत कोपल यांनी करवीर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या दोन्ही घटनांमुळे वडणगे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. वारंवार घरफोडीच्या घटना घडत असल्याने पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. करवीर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!