April 23, 2026 9:20 pm

प्रभाग ३८ मध्ये नवी सुरुवात; प्रतिभाताई चोरघेंचा महिलांसाठी रोजगाराचा संकल्प

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३८ मधून नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या प्रतिभाताई रोहिदास बापू चोरघे यांनी निकालानंतर कोणताही वेळ न दवडता थेट कामाला सुरुवात केली आहे. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी त्यांनी परिसरातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या, तर त्यानंतर भागातील महिलांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेतल्या.
या बैठकीदरम्यान महिलांनी रोजगार, स्वावलंबन, कौशल्य विकास, बचत गट, तसेच महानगरपालिकेच्या योजनांबाबत असलेल्या अडचणी मांडल्या. यावर बोलताना नगरसेविका प्रतिभाताई चोरघे यांनी,
“महिलांना सक्षम बनवणे हेच खरे विकासाचे सूत्र आहे,” असे सांगत, महानगरपालिकेच्या रोजगाराभिमुख योजना, सोयी-सुविधा व विविध शासकीय लाभ प्रभागातील प्रत्येक गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला.
विशेष म्हणजे, निवडून येताच महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देत थेट संवाद साधणारी ही भूमिका महिलांमध्ये विश्वास निर्माण करणारी ठरत आहे. महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी बचत गट, प्रशिक्षण योजना, स्वयंरोजगार उपक्रम आणि महानगरपालिकेच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

निवडणूक जिंकून सत्तेचा आनंद साजरा करण्यापेक्षा, थेट जनतेच्या प्रश्नांसाठी मैदानात उतरलेली नगरसेविका मिळाल्याने प्रभाग क्रमांक ३८ मधील नागरिक, विशेषतः महिलांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!