April 23, 2026 7:53 pm

ठाकरेंना आणखी एक धक्का

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे : मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा पराभव स्वीकारावा लागला असून, केवळ ६५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या राजकीय धक्क्यानंतरच शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार आणि ज्येष्ठ नेत्या नीला देसाई यांचे हृदयविकाराने निधन झाले.

 

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे निकाल न लागल्याने शिवसेना ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. तब्बल अडीच दशकांहून अधिक काळ मुंबईवर वर्चस्व राखणाऱ्या ठाकरे गटाला यंदाच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असतानाच, या पराभवाच्या धक्क्यातून सावरत असतानाच ठाकरे गटासाठी आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे.

 

*मुंबईत ठाकरे गटाची पीछेहाट*

या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मुंबईत केवळ ६५ जागांवर समाधान मानावे लागले आहे. मुंबई महापालिकेवर दीर्घकाळ सत्ता गाजवणाऱ्या ठाकरे गटासाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे भाजपने सर्वाधिक जागा जिंकत मुंबईच्या राजकारणात आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

 

*ज्येष्ठ नेत्या नीला देसाई यांचे निधन*

निवडणूक निकालानंतर काही तासांतच ठाकरे गटासाठी आणखी एक अत्यंत दुःखद घटना घडली. शिवसेनेच्या पहिल्या महिल पुणे पुणे ा आमदार आणि ज्येष्ठ नेत्या नीला देसाई यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. रात्री सुमारे १० वाजता त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. तत्काळ उपचार मिळण्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार

नीला देसाई या शिवसेनेच्या जुन्या आणि निष्ठावंत नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. ज्या काळात राजकारणात महिलांचा सहभाग अत्यंत मर्यादित होता, त्या काळात स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना संधी दिली. त्या शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या होत्या. तसेच विधान परिषदेच्या सदस्य म्हणूनही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती.

 

*ठाकरे गटावर शोककळा*

मुंबईतील निवडणूक निकालामुळे आधीच निराशेच्या छायेत असलेल्या ठाकरे गटावर नीला देसाई यांच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे. पराभवाची सल आणि अनुभवी नेत्या गमावल्यामुळे शिवसेनेवर दुःखाचा सावट पसरल आहे.

निलाताई देसाई या कट्टर शिवसैनिक तर होत्याच त्याचबरोबर एक अभ्यासू नेत्या म्हणून त्यांची ओळख होती.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!