April 23, 2026 3:46 pm

पोलिसांच्या छाप्याने शिवसेना जिल्हाप्रमुख कोसळले?

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक-15 मध्ये घडलेल्या एका गंभीर आणि धक्कादायक घटनेने संपूर्ण शहराचे राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेचे उमेदवार आणि जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांना प्रशासकीय कारवाईच्या तीव्र मानसिक दबावामुळे थेट हृदयविकाराचा झटका आल्याची घटना समोर आली असून, यामुळे मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.

 

शिंदे यांच्यावर प्रचंड मानसिक ताण आला आणि त्याच तणावातून त्यांना हृदयविकाराचा झटका?

आज 12 जानेवारी रोजी आगरकर मळा येथील अनिल शिंदे यांच्या निवासस्थानी प्रशासनाच्या पथकाने अचानक धाड टाकली. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त, वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणा घरात दाखल झाल्याने वातावरण अत्यंत तणावपूर्ण झाले. कोणतीही पूर्वसूचना न देता झालेल्या या कारवाईमुळे शिंदे यांच्यावर प्रचंड मानसिक ताण आला आणि त्याच तणावातून त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समजते.

 

निवडणुकीच्या तोंडावरच प्रशासनाने ही कारवाई का केली?

अनिल शिंदे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं स्पष्ट केलं आहे. या घटनेनंतर शहरभर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, निवडणुकीच्या तोंडावरच प्रशासनाने ही कारवाई का केली? असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!