April 23, 2026 3:57 pm

टोइंग वाहनांचा करार संपल्याने पुण्यात वाढली वाहतूककोंडी

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे : महानगरपालिका निवडणुकीमुळे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे (व्हीआयपी) दौरे, उमेदवारांच्या मिरवणुका, प्रचार फेऱ्या आणि सभा यांमुळे शहरातील वाहतूक मंदावली आहे. त्यातच प्रतिबंधित क्षेत्रात (नो-पार्किंग झोन) बेशिस्तपणे उभी केलेली दुचाकी, चारचाकी आणि मोठी वाहने घेऊन जाण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वापरल्या जाणाऱ्या ‘टोइंग’ वाहनांचा करार नोव्हेंबर २०२५ मध्ये संपुष्टात आल्याने वाहतूक पोलिसांची कारवाई थंडावली आहे. त्यामुळे पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूककोंडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, नागरिकांना दैनंदिन प्रवासात कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.

 

पुणे वाहतूक पोलिस विभागाकडील माहितीनुसार, टोइंग वाहनांचा करार नोव्हेंबर २०२५ मध्ये संपल्यानंतर त्याचे नूतनीकरण करण्याची प्रक्रिया सुरूच झाली नव्हती. त्यातच महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेमुळे नवीन करार किंवा निविदा प्रक्रिया राबवणे शक्य नसल्याने सध्या टोइंग वाहनांची पूर्ण कमतरता भासत आहे. परिणामी, जंगली महाराज रस्ता, सेनापती बापट रस्ता, स्वारगेट, शिवाजीनगर, कोरेगाव पार्क, लष्कर, डेक्कन, कोंढवा, वानवडी, हडपसर, कात्रज, सातारा रोड, बाणेर, औंध, बालेवाडी या प्रमुख ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रात बेशिस्त पार्किंग वाढत असून, वाहनांवर कारवाई थांबली आहे.

 

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मतदानासाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असताना प्रचारात रंगत आली आहे. उमेदवारांच्या प्रचारार्थ पक्षाचे वरिष्ठ नेत्यांचे, तसेच प्रचारासाठी वलयांकित व्यक्ती, अभिनेत्यांमार्फत प्रचार फेरी काढून मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर मिरवणुका, सभा, कोपरा सभा आणि बैठकांवर बैठकांचे सत्र सुरू असल्याने वाहतूककोंडीत प्रचंड वाढ होत आहे. अगोदरच बेशिस्तपणे वाहने उभी केली जात असताना ही नव्याने भर पडल्याने मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पेठा, प्रमुख चौकांतील कोंडीमुळे वाहतूक अडचणीत आली आहे. याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या प्रवासावर होत असून, सकाळ-संध्याकाळी गर्दीच्या वेळी ४०-५० मिनिटांची कोंडी सहन करावी लागत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!