April 23, 2026 5:30 pm

इत्मियाज जलील यांच्या वाहनावर हल्ल्यानंतर तणावाचे वातावरण

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

छत्रपती संभाजीनगर: एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इत्मियाज जलील यांच्या प्रचार वाहनावर हल्ला करण्याच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यानंतर कॉग्रेसचे दोन्ही उमेदवार फरार झाले आहेत. या प्रकरणातील अन्य ५० ते ६० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जलील यांच्या गाडीवर बुधवारी ७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १.१५ वाजता काळे झेंडे दाखवत जलील यांचा निषेध केला. त्यानंतर घोषणाबाजी करत इत्मियाज जलील यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. या गोंधळात एआयएमआयएमचा एक कार्यकर्ता जखमी झाला. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हे दाखल केले.

हल्ला करणारे आरोपी हे रेशनचा काळा बाजार करतात तसेच गुटखा व अवैध बायोडिझेलमध्येही सहभागी असल्याचा आरोप एमआयएमच्या वतीने करण्यात आला होता. या प्रकरणात गुन्हे दाखल करुन कार्यकर्त्यांना पोलीस अटक करत असल्याचे समजताच दोन्ही कुरेशी बंधू फरार झाले आहेत. ८ ते ९ जानेवारी दरम्यान पोलिसांनी एकूण ११ आरोपींना अटक केली आहे. सीसीटीव्ही व व्हिडिओ फुटेजच्या आधारे इतर संशयितांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, या घटनेनंतर काँग्रेसचे फरार उमेदवार हबीब कुरेशी यांच्या पत्नी मलेका कुरेशी यांनीही सिटी चौक पोलीस ठाण्यात विरुद्ध तक्रार दाखल केली होती. एआयएमआयएमचे उमेदवार फिरोज खान व त्यांच्या समर्थकांनी प्रचारादरम्यान अडथळा आणत शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेनंतर पोलीस अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!