April 23, 2026 5:26 pm

शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला दे धक्का

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

ठाणे : राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. या निवडणुकांतील काही ठिकाणी थेट भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळत आहे. त्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर, पुणेसह अनेक ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेना लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे, स्थानिक नेते बेरजेचं गणित आखत आहेत. मात्र, दोन्ही पक्षात एकमेकांनी एकमेकांचे पदाधिकारी फोडू नये असं ठरलं असताना, आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपाचे तीन माजी नगरसेवक यांना आपल्या शिवसेनेत प्रवेश दिला आहे. यावेळीस, भाजप नेते तथा आमदार नरेंद्र मेहतांवर या तिन्ही माजी नगरसेवकांनी आगपाखड केली आहे.

 

ठाणे जिल्ह्यातील मिरा भाईंदरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यात चुरशीची लढत होत आहे. त्यातच, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इथे मोठी घडामोडी घडीली आहे. येथील भाजप नेते नरेंद्र मेहता यांच्या कथित हुकूमशाही कारभाराला कंटाळून भाजपच्या माजी नगरसेविका व नगरसेवकांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये प्रवेश केल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले. भाजपच्या माजी नगरसेविका दीपाली मोकाशी, वीणा भोईर तसेच नगरसेवक सूर्यकांत भोईर यांनी शिवसेनेत आज जाहीर प्रवेश केला आहे.

 

शिवसेना पक्षप्रवेशानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “या सर्व नेत्यांना शिवसेनेत सन्मान आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात येतील. मीरा-भाईंदर शहरात यावेळी भगव्याची लाट असून, जो कोणी भगवा हाती घेईल, त्याच्या पाठीशी शिवसेना आणि प्रताप सरनाईक ठामपणे उभे राहतील. तर तिन्ही नगरसेवकांनी आम्ही भाजपामध्ये अनेक वर्ष काम करूनही आमचं तिकीट कापण्यात आलं. भाजपमध्ये फक्त नरेंद्र मेहता यांचे जवळचे मित्र आणि ठेकेदारांचाच विचार केला गेला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रवेशामुळे मीरा-भाईंदरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा भाजपासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!