April 23, 2026 4:55 pm

सुप्रिया सुळे म्हणाल्या आम्ही पॉझिटिव्ह, माझा कोणावरच राग नाही

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे:- आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. सध्या सगळेच सगळ्याच सोबत आहेत. सगळ्यांच्या युत्या आघाड्या दिसत आहेत असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत जाणार आणि सुप्रिया सुळे मंत्रिपदाची शपथ घेणार अशी चर्चा आहे. याबाबत प्रश्न विचारला असता सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. माझा कुणावरच राग नसतो. तेव्हा ही नव्हता आणि आत्ताही नाही. माझी धोरणात्मक लढाई आहे, वैयक्तिक कोणाशीच नाही असे सुळे म्हणाल्या. 25 जानेवारीला राष्ट्रवादी एकत्र येणार असं सांगितलं जात आहे, काही पॉझिटिव्ह घडेल का? असेही त्यांना विचारण्यात आले, यावर सुळे म्हणाल्या की, ही तारीख मी तुमच्याकडून ऐकत आहे. आम्ही पॉझिटिव्ह आहोत, चांगलच आहे ना. आम्ही आठ निवडून आलो होतो ना ही पॉझिटिव्हच गोष्ट असल्याचे सुळे म्हणाल्या.

गुंडगिरी, पैशांचा भरमसाठ वापर

कॉंग्रेस भाजप एक झाली तर काय बोलणार? ही निवडणूक फ्री फॉर ऑल झाली आहे. यासोबतच गुंडगिरी, पैशांचा भरमसाठ वापर आपण पाहिला आहे. निवडणूक आयोग मात्र दखल घेत नाही असे सुळे म्हणाल्या. महापलिका प्रचार वेगळा असतो. काही उमेदवाराच्या प्रचारासाठी आपण जात असतो. फुल ना फुलाची पाखळी म्हणून मदत करण्यासाठी आल्याचे सुळे म्हणाल्या. अजित पवार आणि तुम्ही उद्या एकत्र प्रचार करणार आहात, याबाबत विचारले असता, सुळे म्हणाल्या की, उद्या आमचा जाहीरनामा प्रसिद्ध होतं आहे.

माझा कुणावरच राग नाही

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर मला अडचण नाही असे सुनिल तटकरे म्हणाले होते. याबाबत बोलताना सुळे म्हणाल्या की, तटकरे काय म्हणाले मला माहिती नाही. माझा कुणावरच राग नसतो. तेव्हा ही नव्हता आणि आत्ताही नाही. माझी धोरणात्मक लढाई आहे वैयक्तिक कोणाशीच नाही असे सुळे म्हणाल्या. 25 जानेवारीला राष्ट्रवादी एकत्र येणार असं सांगितलं जात आहे, काही पॉझिटिव्ह घडेल का? असेही त्यांना विचारण्यात आले, यावर सुळे म्हणाल्या की, ही तारीख मी तुमच्याकडून ऐकत आहे. आम्ही पॉझिटिव्ह आहे चांगलच आहे ना. आम्ही आठ निवडून आलो होतो ना ही पॉझिटिव्हच गोष्ट असल्याचे सुळे म्हणाल्या.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!