April 23, 2026 5:00 pm

पुणे महापालिकेवर भगवा फडकवा, एकनाथ शिंदेंचं आवाहन

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे : महापालिकेसाठी शिवसेनेची पाटी कोरी असली, तरी त्या पाटीवर विकासाची अक्षरे लिहिण्याची ताकद शिवसेनेत आहे. पुणेकरांनी शिवसेनेला भरभरून मतदान करुन विरोधकांना कात्रजचा घाट दाखवावा आणि पुणे महापालिकेवर भगवा फडकवावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कात्रज येथील जाहीर सभेत केले. पुणे महापालिकेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढत असून कार्यकर्ते व पदाधिकारी ताकदीने कामाला लागले आहेत, त्यामुळे विजय आमचाच होणार, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या कात्रज येथील जाहीर सभेला जनसागर लोटला होता. विशेष करुन लाडक्या बहिणींची प्रचंड गर्दी होती.

सभेत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लाडक्या बहिणीकडे लक्ष वेधत शिंदे म्हणाले की, प्रत्येक सभा, रोड शो आणि प्रचार रॅलीत ‘लाडक्या बहिणींची’ संख्या लक्षणीय वाढताना दिसत आहे. महिलांचा सहभाग हा विजयाचा पाया असून ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला ठाम उभ्या असतात, त्यांचा मतपेटीत क्रमांक पहिलाच असतो, असा अनुभव विधानसभेपासून नगरपरिषदांपर्यंत घेतल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभा, विधानसभा आणि नगरपरिषदेत हॅट्ट्रिक झाली असून आता महापालिकेत चौकार मारायचा आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

आमचा अजेंडा सत्ता नाही, तर विकास 

पुणे हे महाराष्ट्राचे चैतन्य आणि विद्येचे माहेरघर असल्याचे सांगत, अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या पुणे महापालिकेला विकासाचे अमृत देण्याची गरज असल्याचे शिंदे म्हणाले. आमचा अजेंडा सत्ता नाही, तर विकास आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवणारा विकास हाच शिवसेनेचा झेंडा आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीत विकासाभिमुख व लोककल्याणकारी निर्णय घेतल्याचा दाखला देत त्यांनी चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडवल्याचा अनुभव सांगितला आणि कात्रजची वाहतूक कोंडीही दूर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा शब्द दिला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!