April 23, 2026 4:57 pm

हरवलेले दागिने पोलिसांकडून परत मिळाल्याने पुणेकर भावुक

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे:- चोरीस गेलेले मोबाईल, मौल्यवान वस्तू आणि विविध गुन्ह्यांतील जप्त केलेला सुमारे चार कोटी रुपयांचा मुद्देमाल संबंधित नागरिकांना वितरित करण्यात आला. या उपक्रमामुळे अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तर चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले. महाराष्ट्र पोलिस रेजिंग डे-२०२६ च्या पार्श्वभूमीवर विमाननगर येथील सिम्बायोसिस महाविद्यालयात ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ आणि मुद्देमाल वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या वेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते शहरातील सात परिमंडळांमधील १०४ गुन्ह्यांशी संबंधित मुद्देमाल मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आला. यामध्ये मोबाईल, मौल्यवान वस्तू, वाहने आदींचा समावेश होता. परिमंडळ – एकमधून सर्वाधिक एक कोटी ८६ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल वितरित करण्यात आला. त्याखालोखाल परिमंडळ- सहामधून ६४ लाख ५१ हजार रुपये, परिमंडळ – तीनमधून ५६ लाख ८१ हजार रुपये, तर इतर परिमंडळांतूनही लक्षणीय प्रमाणात मुद्देमाल परत देण्यात आला.

याशिवाय, ‘सीइआयआर’ पोर्टलच्या माध्यमातून हस्तगत केलेले १८४ मोबाईल संबंधित नागरिकांना परत करण्यात आले. त्यांची एकूण किंमत २५ लाख ८८ हजार रुपये इतकी आहे. चोरीस गेलेले मोबाईल परत मिळाल्याने अनेक नागरिक भावुक झाले. त्यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे विशेष आभार मानले. या कार्यक्रमास पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सोमय मुंडे, हिंमत जाधव यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!