July 25, 2026 7:48 am

जंतर-मंतर आंदोलनाचे पुणे महापालिकेत पडसाद; सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार घोषणाबाजी

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे, दि. २४ जुलै : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ शुक्रवारी पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राजकीय वातावरण चांगलेच तापले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नगरसेवकांनी काळ्या फिती बांधून सभागृहात आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विरोधी पक्षातील नगरसेवकांनी “धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या”, “मोदी सरकारचा धिक्कार असो”, “विद्यार्थ्यांवरील अन्याय बंद करा” अशा घोषणा देत विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित कारवाईचा निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान त्यांनी भाजपसह महायुतीतील घटक पक्षांच्या नगरसेवकांना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनाही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. मात्र, संबंधित सदस्यांनी तटस्थ भूमिका घेत आंदोलनात सहभागी होणे टाळले. दरम्यान, भाजपच्या नगरसेवकांनी विरोधकांच्या घोषणांना प्रत्युत्तर देत “विद्यार्थ्यांची ढाल करून राजकारण करणाऱ्या काँग्रेसचा धिक्कार असो” अशा घोषणा दिल्या. यामुळे सभागृहात काही काळ सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचे वातावरण तणावपूर्ण झाले आणि काही काळ कामकाजात व्यत्यय निर्माण झाला. महापालिकेतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आणि सभागृहातील ज्येष्ठ सदस्यांनी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूंना शांततेचे आवाहन केले. त्यानंतर वातावरण निवळले आणि सर्वसाधारण सभेचे कामकाज पूर्ववत सुरू करण्यात आले. दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेत उमटलेल्या या राजकीय घडामोडींमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष पुन्हा एकदा स्पष्टपणे समोर आला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!