June 5, 2026 6:49 am

शरद पवारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तोंडभरून कौतुक

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

शरद पवार हे केवळ राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातील एक मोठं नाव आहे. शरद पवार यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाची पदे भुषविलेली आहेत. देशातील अनेक नेते त्यांना आपले आदर्श मानतात.

अनेक विरोधी नेतेही त्यांचे कौतुक करतात. मात्र आज मुंबईतील माजी प्रदेश व जिल्हा पदाधिकारी यांच्या स्नेहमेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटले ते सविस्तर जाणून घेऊयात.

मुंबईतील कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी म्हटले की, मी संयोजकांचे धन्यवाद मानतो. आज हा कार्यक्रम आयोजित केला. तुमच्या उमेदीच्या काळात तुम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये काम केलं. मी वयाच्या अठराव्या वर्षी मी पुण्यात युवक काँग्रेसमध्य़े सहभागी झालो होतो. आम्ही काम करत असताना इंदिरा गांधी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष होत्या. इंदिरा गांधी नंतर पंतप्रधान झाल्या, त्यांचा रशिया दौरा झाला. त्यांच स्वागत करण्यात आले नाही, त्यावेळी इंदिरा गांधी लहान मुलांबरोबर खेळायला लागल्या. रशियाचे राष्ट्रपती यांच्या लक्षात आले की आपण स्वागत केले नाही. चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी माफी मागितली होती.’

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘सुरुवातीला बारामती युवक काँग्रेसचा प्रमुख झालो. 4 वर्षांनी महाराष्ट्राचा प्रमुख झालो. आम्ही विनंती केली, आम्हाला पंडित नेहरूंना भेटायचे आहे, शेतकऱ्यांचे आणि इतर प्रश्न नेहरू यांच्या समोर मांडण्याचे ठरले. पंडित नेहरू समोर आले आणि आम्ही काय बोलायचे ते विसरलो. त्यानंतर इंदिरा गांधींसोबत काम करण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्य आहे.’

शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना म्हटले की. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांची आणि आमची वैचारिक भूमिका वेगळी असू शकते. पण आज देशाच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचे काम मोदी करत आहेत ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही. देशाची प्रतिष्ठा जिथे येते तिथे राजकीय मतभेद काढायचे नसतात.’ दरम्यान, याआधीही शरद पवार यांनी नरेंद्र मोदींच्या कामाचे कौतुक केले होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!