June 5, 2026 5:13 am

भ्रष्टाचाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी तुकाराम मुंडेंनी स्वीकारलं Demotion

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

महाराष्ट्रातील वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नव्याने पोस्टींग करण्यात आली आहे. अन्न व औषधी प्रशासन (एफडीए) आयुक्तपदी तुकाराम मुंढेंची नियुक्ती करण्यात आल्याने मागील काही काळापासून पोस्टींगच्या प्रतिक्षेत असलेल्या तुकाराम मुंढेंवर नवीन जबाबदारी पडली आहे.

मागील 21 वर्षांमधील ही त्यांची 25 वी बदली आहे. ही त्यांची फक्त दीड महिन्यात झालेली दुसरी बदली आहे.

तुकाराम मुंढे हे सचिव दर्जाचे अधिकारी आहेत, पण त्यांना आयुक्तपदी नेमण्यात आले आहे. एकप्रकारे पदावनती असली तरी विविध कारणांनी नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या अन्न व औषधी प्रशासन विभागात सफाई करण्यासाठी मुंडे यांना पाठविण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी त्यांचे संबंध कसे असतील, या बाबतही उत्सुकता असेल. मंत्री कार्यालयातील लाचखोरीपासून मंत्र्यांच्या कथित चित्रफितीपर्यंत झिरवाळ हे वादात सापडले होते.

मुंढे यांची गेल्या एप्रिलमध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्या बदलीला लगेच स्थगिती देण्यात आली होती. दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदावरून आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिवम्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर काही अडचणी आल्याने ही नियुक्ती थांबवण्यात आली. तेव्हापासून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. राज्य सरकारने अन्य तीन आयएएस अधिकाऱ्यांचीही बदली केली असून दोन अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. एफडीएमध्ये मुंढेंची नियुक्ती झाली असून ते थेट लोकांशी संबंधित खातं पाहणार असल्याने त्यांच्या या खात्याची कामगिरीबद्दल लोकांमध्ये विशेष उत्सुकता आहे.

2005 बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी असलेले तुकाराम मुंढे हे कठोर, निष्पक्ष आणि भ्रष्टाचारविरोधी कामासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कठोर निर्णयशैलीमुळे अनेकदा राजकीय किंवा प्रभावशाली लोकांच्या दबावाखाली त्यांची बदली होते, असा सामान्य समज आहे. तरीही ते आपल्या कामात कधीही तडजोड करत नाहीत, असं म्हटलं जातं.

अन्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या; कोणाकडे कसला कारभार?

> तुकाराम मुंढे नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते त्यांची आयुक्त, अन्न व औषधी प्रशासन, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

> कान्हुराज बगाटे हे एमडी महाडिस्कॉम, कल्याण पदावर होते त्यांची एमडी, महामुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन पदी बदली झाली आहे.

> श्रीधर डुबे हे अन्न व औषधी प्रशासनाचे आयुक्त होते. जे आता बदलीनंतर सीईओ, झोपडपट्टी पुनर्वसन, ठाणे ही जबाबदारी पार पाडतील.

> बाबासाहेब बेलदार महात्मा फुले महामंडळाचे एमडी होते जे आता धुळे जिल्हा परिषदेचे सीईओ असतील.

> पर्यटन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय खंदारे यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्ये विभागाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. राज्य कामगार विमा योजनेचे आयुक्त आर. एस. चव्हाण यांच्याकडे हाफकीन, मुंबईच्या एमडी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!