May 15, 2026 1:46 pm

६०० किलो चांदीची वाहतूक करणाऱ्या व्हॅनचा भीषण अपघात

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास एका खाजगी कंपनीच्या व्हॅनला भीषण अपघात झाला. चारोटी उड्डाणपुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही व्हॅन दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकली.या अपघातात व्हॅनमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीवर कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्हॅन मुंबईतील एका बुलियन कंपनीकडून वापी येथील कंपनीकडे सुमारे ६०० किलो चांदी घेऊन जात होती. या चांदीच्या विटांची अंदाजे किंमत १७ कोटी ६६ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. पहाटे सव्वा सहा वाजेच्या सुमारास व्हॅन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजकावर चढून गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवरील ट्रेलरला धडकली. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि कासा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

या व्हॅनमध्ये मोठ्या प्रमाणात चांदी आणि सुरक्षा रक्षकाचे शस्त्र असल्याने पोलिसांनी तातडीने सुरक्षिततेच्या दृष्टीने पावले उचलली. कासा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी स्वतः घटनास्थळी उपस्थित असून त्यांनी सर्व मुद्देमाल आपल्या ताब्यात घेतला आहे. मौल्यवान साहित्याची सुरक्षितता लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या देखरेखीखाली क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. जखमींना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!