May 15, 2026 12:49 pm

पुण्यातील दिवे घाटात मध्यरात्री दहशत

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना ताज्या असतानाच आता पुरंदर तालुक्यातील दिवे घाटात एका मोठ्या टोळक्याने तलवारी आणि कोयते नाचवत दहशत माजवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (13 मे) रात्री पुरंदर तालुक्यातील दिवे घाटात 100 ते 150 गाड्यांवर बसून आलेल्या एका टोळक्याने धुमाकूळ घातला. या टोळक्याच्या हातात उघड्या तलवारी आणि कोयते होते. भररस्त्यात धारदार हत्यारांसह गाड्यांचा मोठा ताफा घेऊन या तरुणांनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

आमदार रोहित पवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांना कडक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “पुरंदर तालुक्यातील दिवे घाटात हातात तलवारी, कोयते घेऊन 100-150 गाड्यावर बसून या टोळक्याने दहशत माजवल्याची घटना काल रात्री घडली. या टोळक्याला वेळीच वेसण घातली नाही तर कायद्याला भीक न घालणारे हे टाळके उद्या दहशत माजवून, गुन्हेगारी कृत्ये करुन पुण्याच्या गुन्हेगारीत भर घालण्याचं काम करतील. त्यामुळं पोलिसांनी तत्काळ या घटनेची गंभीर दखल घेऊन हे कोणत्याही पक्षाशी संबंधित असले तरी कुणाच्याही दबावाला बळी न पडता या टोळक्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, ही विनंती!”

गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि परिसरात कोयता गँग, सराईत गुन्हेगारांकडून होणाऱ्या दहशतीच्या घटना वाढल्या आहेत. दिवे घाटातील या ताज्या प्रकारामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता या प्रकरणावर पुणे ग्रामीण पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!