May 14, 2026 10:21 am

नांदेड-बीदर महामार्गावर काळाचा घाला

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

डोंगरशेळकी (जि. लातूर)- नांदेड-बीदर महामार्गावरील एकुर्गा राेड येथे रविवारी दुपारी भीषण अपघात घडला. भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे एकुर्का रोड परिसरात शोककळा पसरली आहे. नामदेव हणमंतराव साळुंखे असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

नामदेव हणमंतराव साळुंखे (वय ३१, रा. एकुर्का रोड, ता. उदगीर) हा तरुण रविवारी (दि.१०) दुपारी ४ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून (क्र. एमएच २४ बीएस ३३६२) नांदेड-उदगीर-बीदर महामार्गावरील एकुर्का रोड परिसरातून जात होता. दरम्यान, पाठीमागून भरधाव आलेल्या कारने (क्र. एमएच २४ बीएल ००१५) त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात हाेती की, दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर नामदेव साळुंखे महामार्गावर फेकला गेला. गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक आणि प्रवाशांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

या अपघाताची माहिती मिळताच वाढवणा (बु.) ठाण्याच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उदगीर येथील रुग्णालयात पाठविला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. याबाबत वाढवणा (बु.) पाेलिस ठाण्यात कारचालकाविराेधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!