May 14, 2026 9:41 am

निदा खानला राजकीय आश्रय देणारा नगरसेवक मतीन पटेल नॉट रिचेबल

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

टीसीएस कंपनीतील कॉर्पोरेट लव्ह जिहाद प्रकरणातील मुख्य आरोपी असलेली निदा खानचा नाशिकमधून फरार झाल्यानंतर दाटीवाटीच्या परिसरात राहण्याचा डाव होता.मात्र पोलिस मागावर असल्याने तिने थेट राजकीय आश्रय शोधल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, तिला बेड्या पडल्यानंतर गुन्ह्यात थेट नाव आलेले नगरसेवक मतीन पटेलला कायदेशीर नोटीस बजावण्यासाठी नाशिक पोलिसांचे एक पथक रविवारी (दि.१०) शहरात दाखल झाले. नियमानुसार ही नोटीस मतीनला प्रत्यक्ष भेटूनच द्यावी लागते. मात्र, मतीन पोलिसांना कुठेही आढळून आला नाही. त्यामुळे पोलिसांना प्रत्यक्ष नोटीस बजावण्यात अडचण निर्माण झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

अधिक माहितीनुसार, सुमारे ४० दिवसांपासून फरार असलेली निदा खान छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव भागातील एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या मदतीने एका फ्लॅटमध्ये लपून बसली होती. पोलिसांनी तिला अटक केल्यानंतर मतीन पटेलला या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले.

लव्ह जिहादचे प्रकरण अंगलट येत असल्याने निदा खानने पळून जाण्याचा कट आखला. पोलिसांच्या तपासाचा वेग आणि तांत्रिक माहितीमुळे तिचा हा कट फसला. पोलिसांना चकवा देण्यासाठी ती अगोदर मुंब्रा, भिवंडी, ठाणे, सोलापूर येथे गेली. पोलिस पिच्छा सोडत नसल्याचे पाहून तिने राजकीय आश्रय घेतला. छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव येथील नगरसेवक मतीन पटेलच्या मदतीने ती दाटीवाटीच्या वस्तीत राहत होती. पळून जाण्याचा प्लॅन फसल्याने ती हैराण झाली. ऐनवेळी निदा खानने राजकीय नेत्यांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात ती आणि तिला मदत करणारे पोलिसांच्या जाळ्यात अडकत गेले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!