May 14, 2026 7:22 am

पिंपरी -चिंचवड पोलीसांची गुन्हेगारी विरोधात मोठी कारवाई

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पिंपरी चिंचवड आयुक्तालय हददीत चालु असलेल्या अवैध अग्निशस्त्र कारवाई मोहीम चालु असतानाच, देहुरोड परिसरात व्यापाऱ्यावर झालेल्या गोळीबार करुन हत्या केल्याच्या घटनेच्या पर्श्वभुमीवर तसेच पिंपरी चिंचवड, पोलीस आयुक्तालय परिसरात वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्या करीता केलेल्या कारवाई अंतर्गत ०४ आरोपींकडुन एकुण ०९ देशी कटटे, ०५ अतिरिक्त मॅक्झिन व ४६ जिवंत काडतुसे असा ०८ लाख रुपये किंमतीचा अवैध अग्निशस्त्र/शस्त्र साठा जप्त.

मा. पोलीस आयुक्त सोो, श्री विनय कुमार चौबे यांचे आदेशान्वये पिंपरी चिंचवड आयुक्तालय हददीत चालु असलेल्या अवैध अग्निशस्त्र कारवाई मोहीम चालु असतानाच देहूरोड पोलीस ठाणे हददीत व्यापाऱ्यावर गोळीबार करुन हत्या अशी गंभिर घटना घडली. त्या अनुशंगाने मा. पोलीस आयुक्त सोो, श्री विनय कुमार चौबे यांनी अत्यंत सतर्क सुचना देवून कारवाई अति तिव्र करणे बाबत आदेश दिल्या प्रमाणे, गुन्हे शाखा युनिट ०१ चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नरेंद्र ठाकरे, यांनी त्यांचे अधिपत्याखालील अधिकारी सहायक पोलीस निरिक्षक दत्तात्रय गुळीग, श्रेणी पोलीस उप निरिक्षक शिवानंद स्वामी यांना मार्गदर्शन करुन, सुचना देवुन आयुक्तालय हददीत, गोपनिय माहीती प्राप्त करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. सदर कारवाई करीत असताना श्रेणी पोलीस उप निरिक्षक शिवानंद स्वामी यांना प्राप्त खबरी नुसार, अवैध शस्त्रां संबधी माहीती प्राप्त झाली. सदर बाबत पिंपरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. क्रमांक २३४/२०२६ आर्म अॅक्ट कलम ३(२५), मपोका कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे दिसुन आले. प्राप्त खबरी नुसार ठोस कारवाई करणे करीता सदरचा गुन्हा मा. वरिष्ठांचे आदेशान्वये गुन्हे शाखा युनिट ०१, कडे वर्ग करुन घेवुन सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान, खालील आरोपींना अटक करण्यात आलेले आहे.

१. अझरुद्दीन रफिक सुतार वय ३० वर्षे, धंदा डिलीव्हरी बॉय, रा. महाराष्ट्र कॉलनी थेरगाव, पुणे.

२. वैभव अशोक शेटे, वय ३१ वर्षे, धंदा सोशल मिडीयावर मॅनेजमेंट, रा. महाराष्ट्र कॉलनी थेरगाव पुणे.

३. सौरभ धनंजय जाधव वय २७ वर्षे धंदा ईस्टेट एजंट, रा. पाषाण पुणे.

४. अक्षय अशोक कांबळे वय ३१ वर्षे धंदा मजुरी रा. पाषाण पुणे.

यांना अटक करुन नमुद गुन्हयाच्या तपासादरम्यान पोलीस कोठडीमध्ये त्यांचेकडुन एकुण ०९ देशी कटटे, ०५ मॅक्झिन व ४६ जिवंत काडतुसे, ०२ वाहने, असा ०८ लाख रुपये किंमतीचा मुददेमाल व अवैध अग्निशख/शस्त्र साठा जप्त करण्यात आला असुन अधिक तपास सपोनि दत्तात्रय गुळीग करीत आहेत.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त श्री शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त श्री सारंग आवाड, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. विशाल हिरे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे प्रभारी अधिकारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री नरेंद्र ठाकरे, सपोनि दत्तात्रय गुळीग, श्रेणी पोलीस उप निरिक्षक शिवानंद स्वामी. स. पोलीस उप निरि. संतोष इंगळे, प्रमोद वेताळ, पोहवा जयवंत राऊत, महादेव जावळे, अजय डगळे, देवा राऊत, शिवराम भोपे, विजय शेळकंदे, सागर अवसरे, मारुती करचुंडे, महिला पोलीस हवालदार उषा दळे, पोकों संदेश देशमुख, लक्ष्मीकांत पतंगे, विजय जानराव, तेजस भालचिम, केशव चेपटे, सोहेल चिखलकर, उध्दव खेडकर, दिपक तांदळे, यांनी केली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!