May 14, 2026 7:25 am

दोषारोप रद्द करा, वाल्मीक कराड, विष्णू चाटेची उच्च न्यायालयात धाव!

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे खंडणी प्रकरणात अपहरण आणि निर्घृण खून प्रकरणात मुख्य आरोपी असलेले वाल्मीक कराड, विष्णू चाटे यांनी आपल्यावरील दोषारोप रद्द करा, अशी मागणी केली आहे.

यासाठी दोघांनी वकिलांमार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने यापुर्वीच या दोघांची ही मागणी फेटाळली आहे.

संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड, विष्णू चाटे यांचे जामीनावर बाहेर येण्यासाठीचे प्रयत्न सुरूच आहेत. वाल्मीक कराड याने आधी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ, उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. पण कोर्टाने त्याला जामीन नाकारला. बाहेर येण्याचे सर्व मार्ग बंद झाले असले तरी आपल्यावरील दोषारोप रद्द करा, या मागणीसाठी कराड, चाटे या दोन्ही आरोपींनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

या दोघांनी बीडच्या विशेष मकोका (MCOCA) न्यायालयाने निश्चित केलेले दोषारोप रद्द करण्यात यावेत, या मागणीसाठी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयात काय सुनावणी होते? याकडे आता सगळ्यांचे लक्ष असणार आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सध्या बीडच्या विशेष मकोका न्यायालयात नियमित सुनावणी सुरू आहे.

या सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांकडून विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. यात प्रामुख्याने घटनास्थळाच्या पंचनाम्याचे व्हिडिओ चित्रीकरण, पुरावा म्हणून जोडलेल्या लॅपटॉपची ‘क्लोन कॉपी’ देण्याची मागणीही याचा समावेश होता. सरकारी पक्ष केवळ त्यांना फायद्याचा असेल तेवढाच डेटा दाखवत असल्याचा आरोप त्यांच्या वकीलांनी केला होता.

न्यायालयाने स्वत: लॅपटॉप कोर्टात ओपन करून संपूर्ण डेटा तपासावा, अशी विनंती आरोपींच्या वकिलांनी केली. तर आरोपी जयराम चाटे याने बीड न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला असून, प्रतीक घुले याने जेलमधूनच आपला अर्ज सादर केला आहे. तर विष्णू चाटे याने जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

9 डिसेंबर 2024 रोजी बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणात पोलीसांनी मुख्य आरोपी वाल्मीक कराडसह आठ आरोपींना अटक केली, तर कृष्णा आंधळे हा आरोप अजूनही फरार आहे. 12 मार्च रोजी या प्रकरणाची पहिली सुनावणी न्यायालयात झाली होती. पोलिसांनी न्यायालयात 1800 पानांचे चार्जशीट सादर केले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 21 मे रोजी होणार आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!