May 14, 2026 2:59 pm

बाळ चोरणाऱ्या महिलेला नागरिकांनी पकडलं अन्…; महिलेकडे आढळलं गुंगीचे औषध चाकू आणि स्प्रे

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पिंपरी चिंचवड शहरातील काळभोर नगर परिसरामध्ये एका अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. लहान बाळ चोरण्याच्या तयारीत असलेल्या एका महिलेला नागरिकांनी पकडून बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

नागरिकांनी चोप दिलेल्या महिलेक कडील बॅग मध्ये चाकू, मुंगीचे औषध आणि स्प्रे आढळून आले आहेत. या महिलेला काळभोर नगर परिसरातील नागरिकांनी पिंपरी पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. ही महिला नेमकं कोणत्या कारणासाठी लहान बाळ चोरी करत होती आणि तिचे आणखी काही साथीदार आहेत का ? याचा तपास सध्या पिंपरी पोलीस करत आहेत. मात्र या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरातील लहान बाळ चोरीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर वर आला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील काळभोर नगर परिसरात बाळ चोरीच्या प्रयत्नाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेला लहान बाळ चोरण्याच्या तयारीत असताना स्थानिक नागरिकांनी संशय आल्याने पकडले. संतप्त नागरिकांनी तिला पकडून चोप दिल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी संबंधित महिलेला अडवून तिची चौकशी केली असता ती समाधानकारक उत्तरे देऊ शकली नाही. यानंतर तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने नागरिकांनी तिला पकडून ठेवले. दरम्यान, तिच्या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये चाकू, गुंगीचे औषध आणि स्प्रे आढळून आले. ही बाब समोर येताच नागरिकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर तत्काळ पिंपरी पोलिसांना माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि महिलेला ताब्यात घेतले. सध्या तिची कसून चौकशी सुरू असून ती नेमकी कोणत्या उद्देशाने बाळ चोरी करण्याच्या तयारीत होती, तसेच तिच्या मागे आणखी कोणी साथीदार आहेत का, याचा तपास पोलिस करत आहेत. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!