May 14, 2026 2:18 pm

तळेरान येथे दोन सख्खे भाऊ बहिण तळ्यात बुडाले

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

तळेरान, ता. जुन्नर येथे पुष्पावती नदी वरील पाझर तलावात दोन सख्खे जुळे बहिण भाऊ बुडुन मयत झाले आहे.ही घटना मंगळवारी दुपारी ११ वाजे दरम्यान घडली असून, यात श्रावणी रामदास साबळे व गणेश रामदास साबळे वय-९, रा.वसईवाडी, तळेरान, ता. जुन्नर, जि. पूणे हे मयत झाले आहे.

हे दोघे ही बहिण भाऊ घोडेगाव येथे शाळा शिकत होते. उन्हाळी सुट्टीमुळे गावी तळेरान वसईवाडी येथे आले होते. मगळवारी येथील पाझर तलावात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत तळेरानचे लोकनियुक्त सरपंच गोविंद साबळे यांनी अधिक माहिती दिली की, श्रावणी व गणेश इतर मुलाबरोबर पाझर तलावात कपडे धुण्यासाठी गेले होते. तलावा जवळ खेळताना हे दोघे बहिण भाऊ पाण्यात बुडाले. हे दोघे बुडाल्याचे इतर मुलांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आरडाओरड केला.

त्यानंतर इतर नागरिकांनी तेथे धाव घेऊन पाण्यात बुडालेल्या दोघांना बाहेर काढले. त्यानंतर ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना उपचारासाठी आणण्यात आले असता येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!