May 15, 2026 12:36 am

आप सोडून भाजपमध्ये गेलेल्या हरभजन सिंगने हायकोर्टाचं दार ठोठावलं

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

भारताचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राज्यसभेचे खासदार असलेल्या हरभजन सिंग यांनी अलीकडेच आम आदमी पार्टी सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

मात्र, त्यांच्या सुरक्षेबाबत आता मोठा वाद निर्माण झाला आहे. हरभजन सिंग यांनी आपली सुरक्षा अचानक हटवण्यात आल्याच्या विरोधात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयमध्ये याचिका दाखल केली आहे. त्यांनी पंजाब सरकारला थेट प्रश्न विचारला आहे की, त्यांच्या सुरक्षेत कपात का करण्यात आली?

काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. आम आदमी पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी हरभजन सिंग यांच्या घराच्या भिंतीवर ‘गद्दार’ असे लिहिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या घटनेतील संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी याचिकेत केली आहे.

दरम्यान, या याचिकेवर सुनावणी करताना पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने पंजाब सरकार आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. पुढील सुनावणी 12 मे रोजी होणार आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जालंधर येथील त्यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, पण नुकताच तो काढून घेण्यात आला.

राजकीय घडामोडींमध्ये, हरभजन सिंह यांच्यासह राघव चढ्ढा, अशोक मित्तल, स्वाती मालीवाल, संदीप पाठक, विक्रम साहनी आणि राजिंदर गुप्ता अशा सात खासदारांनी AAP सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने मोठी खळबळ उडाली. यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांना ‘पंजाबचे गद्दार’ असे संबोधले होते.

राजकीय कारकिर्दीबाबत बोलायचे झाल्यास, भारताचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनी 2022 साली आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आम आदमी पार्टी (AAP) मध्ये प्रवेश केला. मार्च 2022 मध्ये आम आदमी पार्टीने त्यांना पंजाबमधून राज्यसभेसाठी नामनिर्देशित केले. ते बिनविरोध निवडून आले आणि 18 जुलै 2022 रोजी राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली.

आम आदमी पार्टी मधील त्यांची राजकीय इनिंग सुमारे चार वर्षांची राहिली. 24 एप्रिल रोजी काही खासदार पक्ष सोडणार असल्याची माहिती भगवंत मान यांना मिळाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम हरभजन सिंग यांना फोन केला. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार अनेक वेळा कॉल करूनही हरभजन सिंग यांनी तो उचलला नाही. दरम्यान, हरभजन सिंह सध्या आयपीएल 2026 (IPL) साठी कमेंट्री करत असून ते सध्या मुंबईत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!