May 14, 2026 11:57 pm

परळीत दर सोमवारी मांस विक्रीला बंदी; पालिकेने घेतला निर्णय

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून ओळख असलेल्या येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या भावना लक्षात घेवून दर सोमवारी येथे मांस विक्री बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय परळी पालिकेने घेतला आहे.असा निर्णय घेणारी परळी पालिका पहिली पालिका ठरली आहे.

या निर्णयाचे परळीतील शिवभक्तांनी जोरदार स्वागत केले आहे. गेल्या २० एप्रिलला पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय सर्वसाधारण सभेत मांडण्यास मंजूरी देण्यात आली होती. नगराध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरूवारी (ता.३०) पालिका सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेत दर सोमवारी परळी शहरात मांस विक्री बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे परळीतील शिवभक्तांनी जोरदार स्वागत केले आहे.

या सभेला उपनगराध्यक्षा खैसर खाजा पठाण यांच्यासह मुख्याधिकारी पोपट निगळ, उपमुख्याधिकारी संतोष रोडे इतर अधिकारी, नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान, परळी शहरात सार्वजनिक शांतता व धार्मिक पावित्र्य राखण्यासाठी दर सोमवारी व शुक्रवारी दारूची दुकाने कडकडीत बंद ठेवावीत अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक सय्यद फारूख यांनी पालिकेला दिलेल्या निवेदनात केली आहे.

दर सोमवारी मांस विक्री बंद करण्याचा परळी पालिकेने महत्वपूर्ण निर्णय घेवून परळीच्या धार्मिक व पवित्रतेचा सन्मान राखला आहे, हा निर्णय शिवभक्तांच्या भावनाची कदर करणारा आहे, आम्ही शिवभक्त या निर्णयाचे पालिकेचे आभार मानून स्वागत करत आहोत.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!