May 15, 2026 2:53 am

भररस्त्यात कुख्यात तडीपार गुंडाचा खात्मा, 16 राऊंड फायर करुन प्रसिद्ध व्यावसायीकाला संपवले

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुण्यात 24 तासांत 2 हत्या झाल्या आहेत. यामुळे पुण्यात खळबळ माजली आहे. भररस्त्यात कुख्यात तडीपार गुंडाचा खात्मा करण्यात आला आहे. तर, प्रसिद्ध व्यावसायीकाची देखील हत्या करण्यात आली आहे.या व्यावसायीकावर 16 राऊंड फायर करण्यात आले आहेत. पुण्यातील गुंडराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

पुण्यात कुख्यात तडीपार गुंडाचा कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली आहे. गंगानगर परिसरात ही घटना घडली. तडीपार गुंडाचा कोयत्याने हल्ला करत खून करण्यात आला. राणा कांबळे असे हत्या झालेल्या कुख्यात गुंडाचे नाव आहे. राणा कांबळे गेल्यात अनेक महिन्यापासून होता तडीपार तडीपार असताना सुद्धा पुण्यातील गंगा नगर परिसरात राणाची दहशत होती. कांबळे याच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. वर्चस्व वादातून ओम मोरे आणि त्याच्या साथीदारांनी राणा कांबळे याच्यावर कोयत्याने सभासप वार करत हत्या केली.

देहू रोड परिसरात धक्कादायक घटना घडली. रमेश रेड्डी नावाच्या व्यावासायीकाची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. रमेश रेड्डी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास सावना चौकात थांबले असताना हल्ला झाला. दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी अचानक त्यांच्यावर गोळीबार केला. रेड्डी यांच्यावर 16 राऊंड गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी एक गोळी त्यांच्या डोक्यात लागली. गंभीर अवस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

गेल्या वर्षी विक्रम गुरुस्वामी रेड्डी यांची हत्या झाली. विक्रम हे रमेश रेड्डी यांचे भाऊ आहेत. रमेश रेड्डी यांच्या हत्येचा संबंध विक्रम यांच्या हत्येशीही जोडला जात आहे. एका वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादातून झालेल्या गोळीबारात रेड्डी यांची हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे, त्या प्रकरणातील आरोपी अजूनही तुरुंगात असून त्यांना जामीन मंजूर झालेला नाही.

सध्या, देहू रोड पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, येत्या काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!