May 15, 2026 2:08 am

मिसिंग लिंकच्या बोगद्याखाली गुप्त बोगदा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक अधिक सुलभ होण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) उभारलेला मिसिंग लिंक प्रकल्प येत्या १ मेपासून सुरू होत आहे. मिसिंग लिंकवरील देशातील सर्वाधिक २३.५ मीटर रुंदीच्या बोगद्याच्या खोदकामासाठी खालील बाजूस समांतर लहान बोगदा तयार केला आहे.

त्यामुळे एका बाजूला डोंगर, तर दुसऱ्या बाजूला १८० मीटर खोल दरी असतानाही मिसिंग लिंकच्या बोगद्याचे खोदकाम करणे शक्य झाले. तसेच भविष्यात आपत्कालीन परिस्थितीत या बोगद्याचा वापर करता येणार आहे.

सुमारे साडेतेरा किलोमीटरच्या मिसिंग लिंक प्रकल्पासाठी खोपोली एक्झिटच्या पुढे खोल दरीपर्यंत १.६४ किमीचा, तर दरीपासून पुढे कुसगावपर्यंत ८.९६ किमी लांबीचा बोगदा तयार करण्याचे मोठे आव्हान होते. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी अवजड यंत्रसामग्री, स्टील, सिमेंट, कारागीर पोहोचवायचे कसे, खोदकामातून निघणारा मलबा बाहेर काढण्याचाही मोठा प्रश्न होता या पार्श्वभूमीवर या पॅकेजचे काम करणाऱ्या नवयुगा कन्स्ट्रक्शन कंपनीने प्रस्तावित बोगद्याच्या खालील बाजूस मध्यभागी अतिरिक्त बोगदा तयार केला. दरीपासून खोपोली एक्झिटच्या दिशेने जोडणी मार्ग म्हणून समांतर बोगदा तयार केल्याने महाकाय बोगद्याचे काम सोपे झाल्याचे नवयुगा कन्स्ट्रक्शनचे प्रकल्प व्यवस्थापक ईश्वराव के, यांनी सांगितले.

मिसिंग लिंकवरील हा गुप्त बोगदा भविष्यात संकटमोचक बनू शकतो. मिसिंग लिंकच्या बोगद्यात अपघात झाल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात जाण्यासाठी व्यवस्था केली आहे. त्यापेक्षाही काही आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास समांतर असलेल्या लहान बोगद्यातून दरीत उतरणे शक्य होणार आहे. तसेच बोगद्यात आवश्यक मदत पोहोचवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकणार आहे.

पॅकेज-१ मध्ये तयार केलेला पहिला बोगदा खोपोली एक्झिटपासून एक किलोमीटर अंतरावर आहे; परंतु काम सुरू करण्यापूर्वी बोगद्याच्या दरीकडील बाजूपर्यंत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने खोपोलीत जाऊन पुढे १० किलोमीटरचा वळसा घालून उंबरखिंडीतून पुढे दरीत जावे लागत. त्यामध्ये वेळ आणि खर्च जास्त लागत असल्याने आम्ही प्रकल्प आराखड्यात नसतानाही जोडमार्ग म्हणून लहान बोगदा तयार केल्याचे नवयुगा कन्स्ट्रक्शनचे अधिकारी आयुष्य पटेल यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!