May 15, 2026 6:58 am

अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून तरुणाची हत्या

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

घराच्या छतावर झोपलेल्या तरुणावर कुऱ्हाडीने वार करत त्याची हत्या केल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव जंगल भागात घडली.अनैतिक संबंधाच्या संशयातून या तरुणाची हत्या झाली असल्याचा शंका आहे. या हत्याप्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. आशिष उर्फ कृष्णा खंडूजी कांबळे (वय २२) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

वडगाव जंगल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोरीसिंह येथे एका घराच्या छतावर आशिष उर्फ कृष्णा खंडूजी कांबळे झोपलेला होता. त्यावेळी त्याच्यावर आरोपीनं कुऱ्हाडीने हल्ला चढवला. त्याच्या हाता, पायावर वार केला. पांडुरंग प्रल्हाद कांबळे (वय ४०) असं आरोपीचे नाव आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, पांडुरंग कांबळे याच्या पत्नीसोबत कृष्णा कांबळेचे अनैतिक संबंध होते. त्याच्या राग पांडुरंग कांबळेच्या मनात होता. समाजात झालेल्या बदनामी झाल्यामुळे पांडुरंग कांबळेने आशिषच्या हत्येचा कट रचला.

सोमवारी रात्री आशिष घराच्या छतावर झोपलेला असताना पांडुरंगने कुर्ऱ्हाडीने त्याच्यावर हल्ला केला. पांडुरंगने आशिषचा भाऊ शरद खंडूजी कांबळे याच्यावरही कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात शरद जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या हत्याकांडाची माहिती मिळताच या घटनेची माहिती मिळताच वडगाव जंगल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून आरोपी पांडुरंगला अटक केली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!