कात्रज परिसरात हरवलेल्या आजी पार्वती खवले यांना हेल्प रायडर्सच्या मदतीने सुरक्षित घरी पोहोचवले
कात्रज परिसरात गेल्या दोन दिवसांपासून आपल्या नवऱ्याचा शोध घेत भटकत असलेल्या आजी पार्वती खवले यांची सुखरूप सुटका हेल्प रायडर्सच्या टीमवर्कमुळे शक्य झाली.
कात्रज येथे सौ. हेमलता विनायक कोळपे यांनी आजींना पाहून त्यांची विचारपूस केली. परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी हेल्प रायडर अजीत जाधव यांना फोनद्वारे माहिती दिली तसेच पोलीसांनाही कळवले. त्यानंतर ही माहिती हेल्प रायडर ग्रुपवर पोस्ट करण्यात आली.
माहिती मिळताच हेल्प रायडर बाळासाहेब ढमाले यांनी तात्काळ कोळपे यांच्या घरी जाऊन आजींकडून सविस्तर माहिती घेतली. दरम्यान, ग्रुपवरील ही पोस्ट सातारा येथील हेल्प रायडर कैलास डोंबे यांनी पाहिली आणि त्यांनी साताऱ्यातील आजींच्या नातेवाईकांचा संपर्क क्रमांक शोधून काढला.
यानंतर बाळासाहेब ढमाले यांनी संबंधित नातेवाईकांशी संपर्क साधून खातरजमा (सहनिशा) केली आणि आजी पार्वती खवले यांना त्यांच्या ताब्यात सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आले.
ही संपूर्ण कार्यवाही अजीत जाधव ,बाळासाहेब ढमाले ,कैलास डोंबे (सातारा )
हेल्प रायडर्सच्या तत्परता, समन्वय आणि उत्कृष्ट टीमवर्कचे उत्तम उदाहरण ठरले
हेल्प रायडर्स – (जीव वाचवण्याची एक चळवळ)
– प्रशांत कनोजिया











