April 24, 2026 4:43 pm

अशोक खरातचे वकील कोर्टात संतापले, म्हणाले, एसआयटी सारखं तेच पाणी आणि पेढे करत बसलेय

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

धार्मिक विधी आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरात याला आज न्यायालयाने  पुन्हा मोठा दणका दिला आहे.महिला अत्याचार प्रकरणातील सहाव्या गुन्ह्यात विशेष तपास पथकाने (SIT) खरातचा ताबा घेतला असून, त्याला 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अशोक खरात याला आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या (VC) माध्यमातून न्यायालयात हजर करण्यात आले. कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयात एका महिलेला गुंगीचे द्रव्य पावून, पेढे आणि इतर पदार्थ खाऊ घालून तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा खरातवर दाखल आहे. याच गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी एसआयटीने त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.

कोर्टात सरकारी वकील म्हणाले की, महिला अत्याचार प्रकरणी हा महत्त्वाचा गुन्हा आहे. आरोपी पीडित महिलेला घाबरवित होता. माझ्याकडे दैवी शक्ती आहे. पीडितेला तिच्या वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवित होता. पीडितेला पाणी, पेढे देत होता. आणखी त्याने काय-काय केले आहे? याचा शोध घ्यावा लागणार त्यामुळे पोलीस कोठडी मिळण्याची मागणी करण्यात आली.

यावर आरोपी खरातच्या वकिलांनी कोठडीला विरोध करताना म्हटले की, सहा केस आहेत, या केसमध्ये देखील तेच पाणी, तेच पेढे आहेत. एसआयटीला अजून काही सापडलं नाही का? आर्थिक विषय फिर्यादीत नाहीत. त्यामुळे तो निर्माण करायचा आहे का? पोलीस कोठडीची गरज नाही. दरवेळी तीच करणे सांगत आहेत आणि पोलीस कोठडी वाढवून मागत आहे. एसआयटीला आरोपीला बसवून ठेवण्यात काय आनंद आहे हेच कळत नाही, असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला.

यानंतर तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात स्पष्ट केले की, प्रत्येक गुन्ह्यात पीडित महिला वेगळी आहे. त्यामुळे तपास झाला पाहिजे. त्यासाठी आरोपीचा प्रत्यक्ष ताबा पाहिजे आहे, असे म्हणत सलग सहाव्या गुन्ह्यात एसआयटीकडून अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर अशोक खरात याला न्यायालयाने 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!